
Mumbai : कांदिवलीतील एका दुकानात मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी धाड टाकण्यासाठी पोहोचले. मात्र काही वेळातच स्थानिक गुंड तसेच तथाकथित राजकीय कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्यांना घेरुन बाचाबाची सुरु केली. प्रकरण हातघाईवर येण्याचे चित्र निर्माण झाले आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करता परतावे लागले… अशा घटनांचा सामना गेल्या वर्षभरात एफडीएच्या अधिकाऱ्यांना अनेकदा करावा लागला आहे. तरीही गुटखा विरोधी मोहीम तीव्र करण्याचा निर्धार एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे.
तरुण पिढीच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटखा विक्रीवर राज्यात २०१२पासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र आजही शाळा कॉलेजच्या परिसरातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा व पान मसाला सहज मिळताना दिसतो. पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाला या बेकायदा गुटख्यावर कारवाई करण्याचे अधिकार असले तरी या दोन्ही यंत्रणांमध्ये सुसंवाद अभावानेच आढळून येतो. काही प्रकरणात एफडीए च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे सहकार्य मागितले असता त्यांना पोलीस ठाण्यात बसवून चहापान करवले व नंतर पोलीस घेऊन ते कारवाईसाठी संबंधित दुकानात गेले असता काहीही हाती लागले नाही. याचा अर्थ कोणीतरी कारवाईची माहिती आधिच दिली असणार असे एफडीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे. बहुतेकवेळा एफडीएचे अधिकारी कारवाईसाठी जातात तेव्हा स्थानिक गुंड तसेच राजकीय कार्यकर्ते वा नेते येऊन अडथळा आणतात. परिणामी अनेकदा प्रभावी कारवाई करता येत नाही असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
|
Pune : शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
|
यातील खरी गोम म्हणजे एफडीएकडे आजघडीला कारवाईसाठी पुरेसे अधिकारी व कर्मचारी नाहीत. अन्न निरीक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. तसेच कारवाई केल्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक असते त्यासाठी लिपिक नाहीत तसेच टंकलेखही नाहीत. परिणामी पुरेशा सुरक्षेशिवाय स्वतः च्या जीवावर उदार होऊन कारवाई करायची आणि नंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करत बसायचे. यातूनच अधिकारीही कारवाईबाबत उदासिनता बाळगून असतात.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मोठ्या प्रमाणात अन्न व औषध निरीक्षक तसेच कर्मचारी भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत गुटख्यावरील कारवाई आम्ही थांबू देणार नाही, असे अभिमन्यू काळे यांनी सांगितले. १ एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात गुटखा कारवाईसाठी एकूण १४९४ ठिकाणी तपासणी करण्यात आली असून यात ८५१ जणांवर अफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर ३० कोटी २४ लाख ९४८ रुपयांचा गुटखा वा तत्सम पदार्थ जप्त करण्यात आल्याचे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले. १ एप्रिल २४ ते १४ जून २४ पर्यंत एकूण २१८ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून १२७ लोकांना अटक करण्यात आली. याशिवाय १०५ दुकांनाना टाळे ठोकण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
देशात दरवर्षी कर्करोगाने ५२ हजार लोकांचा मृत्यू होतो तर दरवर्षी ७७ हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होत असून यातील बहुतेकजण तंबाखू वा गुटखा सेवन करणारे आहेत. प्रामुख्याने तरुणांमध्ये गुटखा वा तत्सम पदार्थ खाण्याची सवय मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने शाळा कॉलेजच्या परिसरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर निर्दयपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
शहर
- पुणे: 'दुकान उघडलंस तर ठार मारेन!' दारूसाठी पैसे मागितल्याचा राग; वाईन शॉप कर्मचाऱ्यावर बाटलीने जीवघेणा हल्ला
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- गोव्यात जन्म-मृत्यू नोंदणी आता पूर्णपणे ऑनलाइन; १ जुलैपासून केंद्रीय CRS पोर्टलवरूनच होणार सर्व प्रक्रिया!
महाराष्ट्र
- शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महा-धरणे आंदोलन!
- अमरावती: बसच चोरीला... तेही थेट बसस्थानकातून! आरोपीची २० बसेस चोरल्याची कबुली; पोलिसही चक्रावले
- अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका! माहिती अधिकार नियमांतील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र
- पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रोडवर १५ दिवसांपासून वाहतेय मुतारीचे पाणी; प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर!
गुन्हा
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
- ऐरोली महापालिका रुग्णालयाचा हलगर्जीपणा! चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती सोनम डोंगरे आणि बाळाचा मृत्यू; नवी मुंबईत खळबळ!
- रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीची तस्करी करताना महाराष्ट्रातील दोन पोलीस छत्तीसगडमध्ये जेरबंद; खवल्या मांजराचे खवलेही जप्त!
- कोठडीतील मृत्यूला जबाबदार कोण? वाशिममधील धक्कादायक प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा!
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मायलेज न सांगताच मारुतीची 'फ्लेक्स-फ्यूल' वॅगनआर बाजारात; तीन आठवड्यांत केवळ ३ कारची विक्री!
- आता आयुष्मान भारत योजनेची कामे होतील व्हॉट्सॲपवर; केंद्र सरकारचा 'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च!
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- कोकणात पावसाचा हाहाकार; ५ जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' कायम! केरळ ते महाराष्ट्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय.




























Subscribe to my channel

