Pune : मुलाला शॉक लागला म्हणून आई वाचवायला धावली, माय- लेक दोघांचाही मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Pune : विजेचा शॉक लागून आई- आणि मुलाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकणमधील खराबवाडी येथे घडली. आधी मुलाला शॉक लागल्याने आई मदतीला धावली अन् हा अनर्थ घडला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाकणमधील खराबवाडी येथे घराच्या छतावर वीजेचा शॉक लागुन मायलेकाची जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. पल्लवी जाजु असे आईचे नाव आहे, तर समर्थ जाजु (वय, १५) असे मृत मुलाचे नाव आहे.

घराच्या छतावर आईसोबत 15 वर्षीय मुलगा छतावर आला होता. यावेळी बाजुला असणाऱ्या पत्र्यामध्ये विद्युत लाईट प्रवाह उतरला. या पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलाला शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी गेली असताना आईलाही शॉक लागला. यामध्ये १५ वर्षीय मुलासह आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *