
Raj Thackeray : राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी प्रचारसभांचा धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरात गारवा आला आहे. मात्र, राजकीय नेत्यांच्या भाषणांनी राजकीय वातावरण तापल्याच पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुणे शहरात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, मौलवी आणि मशिदींमधून फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना ठणकावलं. तसेच, काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं कौतुकही केलं.
भाषणाच्या सुरुवातालीच आज पुणे शहर कुठून कुठपर्यंत पोहोचलं आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पुणे शहराच्या विस्तारीकरण व सोयीसुविधांबद्दल राज यांनी खंत व्यक्त केली. तर, पुण्यातील सभेतून अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक करत शरद पवारांना लक्ष्य केलं. अजित पवार या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, माझे त्यांच्याबद्दल अनेक मतभेद असतील, पण मी जेवढं त्यांना ओळखतो, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांनी जातीपातीच राजकारण केलं नाही. संभाजी पार्कमध्ये 1999 पासून हे जातीपातीचं विष पसरवलं गेलं, असे म्हणत राज यांनी शरद पवारांना जातीपातीच्या राजकारणावरुन लक्ष्य केलं.
|
Pune News : पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट |
मुस्लीम माणसं ही तुमची घरची गुरं-ढोरं नाहीत
आमची शहरं बर्बाद झाली तरी चालेल, पण आम्ही पेटतो ते जातीपातीच्या विषयांवरुन. तुमच्या याच मानसिकतेचा गैरफायदा हे लोक घेत आहेत. आज काय तर म्हणे, मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये, मशिंदीमध्ये फतवे निघत आहेत. काँग्रेसला मतदान करा, मुसलमान समाजाने काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे, असे फतवे निघत आहेत. मात्र, या देशात अनेक मुसलमान आहेत, ज्यांना अकला आहेत, ते ह्यांच्या वाटेला जाणार नाहीत. त्या मुसलमानान समजतं हे राजकारण कुठं चाललंय ते, हे फतवे काढणारे मुस्लीम समाजाला काय समजता, ही तुमची घरची गुरं-ढोरं आहेत का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच, निवडणुकांच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की, काँग्रेसला- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा.
गेल्या 10 वर्षात तोंड वर काढलं नाही
मशिंदीमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की ह्यांना मतदान करा, मग आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... मुरलीधर मोहोळ असतील, भाजपाचे उमेदवार असतील, शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरगोस मतदान करा. ही जी अनेक लोकांची चुळबूळ सुरू आहे ना काँग्रेसला मतदान करा म्हणून त्याचे कारण, गेल्या 10 वर्षांत ह्यांना तोंड वर काढता आलं नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी फतवा काढणाऱ्यांना लक्ष्य केलं. माझे मोदी सरकारबद्दलचे जे काही मतभेद आहेत ते राहणार, पण मी चांगल्या गोष्टींचे समर्थनही करणार असल्याचेही राज यांनी म्हटले.
राम मंदिर व कारसेवकाची आठवण
मला 1980-90 चा तो काळ आजही आठवतोय, या लोकांचा उन्माद सुरू होता. या सगळ्या गोष्टींचा शेवट होता तो बाबरी मशिदीचा ढाचा पडणे. बाबरीचा ढाचा पडल्यानंतर कधीही वाटलं नव्हतं की राम मंदिर उभारलं जाईल. पण, तुम्हाला निश्चित सांगतो, राम मंदिर फक्त नरेंद्र मोदींमुळेच या देशात होऊ शकलं. जो माझा कारसेवक गेला, त्यांना गोळ्या मारुन ठार केलं. जेव्हा ते राम मंदिर झालं, तेव्हा कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल, असे म्हणत राज ठाकरेंनी राम मंदिर उभारणीचा इतिहासही सांगितला.
दरम्यान, भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी, माझ्या पुण्यातील हिंदू बांधवांनो, भगिनींनी मातांनो मी तुम्हाला एवढचं सांगतो, तुम्हीही मोहोळ उठवा, असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचं आवाहन पुणेकरांना केलं आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



