
Uruli Kanchan : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कंझार भट परिसरातील एका शेतामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई करून तब्बल ३ चार हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी एकाला ताब्यात घेत दारू बनविण्याचे कच्चे रसायन, साहित्य जप्त केले आहे. कांतीलाल जवार राठोड, (वय ३४), रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे गावातील एका शेतामध्ये गावठी दारूची भट्टी असल्याची माहिती खबर्याकडून मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सदर शेतामध्ये छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी भट्टीचालक राठोड याला ताब्यात घेत चार हजार लिटर दारू असलेली ११२ कॅन जप्त केले. तसेच हातभट्टी बनवण्याची साधने जागीच नष्ट केली.
|
Pune Weather Update : पुणे जिल्ह्यात उकाडा वाढला अनेक ठिकाणी पारा ४० शी पार |
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (बारामती) संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड) स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पडुळे, सहाय्यक फौजदार उमेश जगताप, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस हवालदार शशिकांत खाडे, पोलीस हवालदार होळकर, पोलीस शिपाई अमोल खांडेकर, पोलीस शिपाई अक्षय कामटे, पोलीस शिपाई अमोल राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस हवालदार घाडगे, पोलीस हवालदार भुजबळ यांच्या पथकाने केली.
मागील एक महिन्यात उरुळी कांचन पोलिसांनी याच शेतातील एका दारूच्या अड्ड्यावर कारवाई केली होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. जागेचा मालक आपला या दारुशी व भट्टीशी काहीही संबंध नसल्याचे सांगत होता. सदर जागामालक जेलमध्ये असतानाही शेतामध्ये गावठी दारूची भट्टी चालवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये त्यांना कल्पना न देता चोरट्या स्वरुपात उसाच्या शेतामध्ये दारूच्या भट्ट्या चालवल्या जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




