
Pune : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बारामती आणि राहुरी या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी निधन झाल्यामुळे राहुरी मतदारसंघाचीदेखील जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी असे मत मांडले आहे. सर्वांनी एकमताने याबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली तर आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात उतरु, असंदेखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता विरोधक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ. पण अद्याप तरी या संदर्भात कुठला प्रस्ताव सत्ताधारी पक्षांकडून आलेला नाही. याआधी अशा घटना घडल्या तेव्हा आम्ही अनेक ठिकाणी बिनविरोध विचार केला. पण त्यांनी उमेदवार उतरवले. नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी सरसकट बिनविरोध झाल्याचं यापूर्वी निर्णय झाल्याची मला माहिती नाही", अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. "अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. आताच निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही सर्वजण चर्चा करुन निर्णय घेऊ", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. "बारामतीचा विषयच नाही. मी आधीही बोलले आहे की, आमच्याकडून सुनेत्रा वहिणी यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. अर्थातच आम्ही पोटनिवडणूक लढणार नाहीत. महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कधीच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनीदेखील आपल्या पक्षाच्या भूमिका मांडली आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधीमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबत त्यांची चर्चा होईल. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांचं काय? याचंही उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद न देणं यासारखा मोठा नक्षलवाद नाही", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



