
Chhatrapati Sambhaji Nagar : आतापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना पहिल्या असतील, पण छत्रपती संभाजीनगरच्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात चक्क पीएचडी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश बैस यांनी या पीएचडीचे संशोधनच रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द झाली आहे. किशोर निवृत्ती धावे असे 'कॉपी-पेस्ट' करणाऱ्याचे नाव असून, धावे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या प्रबंधात 51 ते 65 टक्के चोरी केल्याचे समोर आले आहे.
अधिक माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी दहा वर्षांपूर्वी पीएच.डी पदवी प्राप्त केलेली होती. 'किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्त्व आणि आदिवासीसाठींच्या कल्याणकारी ध्येय धोरणांची 'अंमलबजावणी' या विषयांतर्गत त्यांनी 2013 मध्ये पीएच.डी. प्राप्त झाली. सदरील शोध प्रबंधात वाङ्मय चोरी करण्यात आली असल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोधप्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याची तक्रार होती. या तक्रारीनुसार डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती (इन्स्टिटयूशनल अॅकेडमिक इंटिग्रेटेड पॅनेल) नेमण्यात आली.
|
Onion : सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलोसाठी मिळतोय एवढा दर; शेतकऱ्यांना दिलासा |
सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य
समितीने शोधप्रबंधात 51 टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. चा चौकशीत 65 टक्के वाड्:मयचौर्य केल्याचा अहवाल देण्यात आला. यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद बैठकीतही सवार्नुमते हा अहवाल स्विकारुन पीएच.डी. रद्द करण्यास संमती देण्यात आली. या नंतर गेल्या महिन्यात कुलपती रमेश बैस यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. विद्यापीठाच्यावतीने प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा व विधि अधिकारी किशोर नाडे यावेळी उपस्थित होते. या सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करुन पीएच.डी. रद्द करण्याचा निर्णय कुलपती यांनी मंजूर केला आहे.
विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विषयात अनेकांनी पीएचडी मिळवली आहे. यासाठी संशोधन करून पीएचडीधारक पदवी मिळवत असतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



