
Uddhav thackeray : अजित पवार आणि समर्थकांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात राजकीय भूंकप घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.
आज ठाकरे गटाची मातोश्रीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे विविध शहरांमध्ये जाऊन संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच या बैठकीत सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीला कशा प्रकारे सामोरे जायचं, यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
या बैठकीत समान नागरी कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. बाळासाहेबांची समर्थनार्थ भूमिका होती, यामुळे, ठाकरे गट कायद्याचा मसुदा काय आहे, हे पाहून भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
मातोश्रीत झालेल्या बैठकीत नेमक्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावर भाष्य करताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, 'उद्धव साहेबांनी दौरा करावा, अशा प्रकारचा आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्याने सांगत आहेत. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता, आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील'.
उद्धव ठाकरे 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार का, यावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, 'या प्रकारचा कोणताही विचार आणि अशी चर्चा बैठकीत कोणी केलले नाही. आमच्या महाविकास आघाडीत फूट पाडण्याकरिता भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहेत'.
|
|
राष्ट्रावादीच्या फूटीनंतर महाविकास आघाडी सज्ज
राष्ट्रवादीतील फूटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. राज्यातील राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून करणार महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.
महाविकास आघाडीचे नेते उत्तर महाराष्ट्रातून दौऱ्याला लवकरच सुरूवात करणार आहे. लोकशाही विरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार, अशी आक्रमक पवित्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




