
Biparjoy Cyclone : अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या जखाऊ बंदराला धडकले. यावेळी वादळातील वाऱ्यांचा वेग १४५ किमी प्रतितास इतका होता, तर वादळ १५ किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून येथे सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. वादळ धडकण्याची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
‘बिपोरजॉय’ चक्रीवादळ मागील दहा दिवसांपासून वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत होते. चक्रीवादळ दुपारी धडकण्याचा पूर्वीचा अंदाज होता. प्रत्यक्षात ते संध्याकाळी ते धडकण्यास सुरुवात झाली.
यावेळी वादळ जखाऊ बंदरापासून ७० किलोमीटर दूर समुद्रात होते. समुद्रातून वादळ पूर्णपणे जमिनीवर सरकण्यास किमान चार तास लागतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.
हे श्रेणी-३ मधील वादळ आहे. चक्रीवादळाच्या डोळ्याची, म्हणजेच केंद्रबिंदूची रुंदी ५० किलोमीटर आहे. हे चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने सरकताना वाऱ्याचा वेग वाढत जाईल, असे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले. कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
याशिवाय, पिके, घरे, रस्ते, वीजेचे खांब यांचेही नुकसान होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळाची पूर्वकल्पना असल्याने गुजरात सरकारने सुमारे एक लाखांहून अधिक जणांना सुरक्षितस्थळी आधीच हलविले होते.
यामुळे कोणतीही जीवित हानी न होण्याची आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे. वादळाच्या प्रभावामुळे आज सकाळपासूनच मुंबई आणि गुजरातच्या किनारपट्टीवर उंच लाटा उसळत होत्या.
सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतही समुद्रकिनारी जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती. वादळामुळे किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळला असून वादळी वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडली.
तापमानबदलाचा परिणाम
बिपोरजॉय हे भारताला धडकणारे या वर्षातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे चक्रीवादळ आहे. हे वादळ पाकिस्तानातही घुसणार आहे. मागील काही दशकांत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १.२ अंश सेल्सिअसवरून १.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने अरबी समुद्रात तयार होणारी वादळे अधिक शक्तिशाली ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सरकारकडून आढावा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला. वादळाची पूर्वकल्पना असल्याने केंद्र आणि गुजरात सरकारने किनारपट्टीवर राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलांची मिळून ३० पथके तैनात केली आहेत.
याशिवाय, राज्याच्या रस्ते आणि बांधकाम विभागाची ११५ पथके, वीज मंडळाची ३९७ पथके तैनात आहेत. याशिवाय, तिन्ही संरक्षण दलांची पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिक आणि हजारो जनावरांना सुरक्षितस्थळी हलविल्याने जीवित हानी होणार नाही, अशी सरकारला आशा आहे.
दीर्घकाळ टिकलेले वादळ
‘बिपोरजॉय’ हे अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ ठरले असल्याचे भारतीय हवामान विभागाकडील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. सहा जून रोजी पहाटे साडे पाच वाजता तयार झालेले हे वादळ दहा दिवस आणि बारा तासांपासून (गुरुवारी संध्याकाळपर्यंत) समुद्रांत घोंघावत आहे. आधीच्या नोंदीनुसार, २०१९ मध्ये तयार झालेले क्यार हे चक्रीवादळ नऊ दिवस १५ तास टिकले होते.
बिपोरजॉय’चा परिणाम
-
किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट
-
किनारपट्टीपासून १० किमीच्या अंतरावरील वीस गावांमधील लोक सुरक्षितस्थळी
-
वादळी वाऱ्यांमुळे २४० गावांमधील वीजपुरवठा खंडित
-
सखल भागांमध्ये पुराचा धोका, अनेक वृक्ष उन्मळून पडले
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




