
Mumbai : इराण युद्धामुळे पश्चिम आशिया तसेच आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींत वाढ झाल्याने स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना घरगुती वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यास सांगितलं असल्याने त्याचा परिणाम मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना जाणवू लागला आहे.
व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ज्या हॉटेलांकडे सिलिंडरचा साठा नव्हता अशी जवळपास २० टक्के उपहारगृहे सोमवारपासूनच बंद असल्याचे निदर्शनास आले. ही परिस्थिती कायम राहिल्यास आज, मंगळवारपासून ७० ते ८० टक्के उपहारगृहे बंद होतील असा अंदाज 'आहार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
'आहार' संघटनेशी आठ हजार हॉटेले, रेस्तराँ, फाइन डाइन, कॅफेटेरिया संबंधित आहेत. यातील मुंबईतील अनेक हॉटेल सोमवारीच सिलिंडर पुरवठ्याशिवाय बंद झाल्याची माहिती 'आहार'चे २०२५-२६ चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिली.
'आहार' ही राज्यभरातील ६६ हॉटेल असोसिएशनची पालक संस्था आहे. या सगळ्याच संस्था घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्याच्या निर्बंधांना तोंड देत असून यावर सध्या तरी कोणताही उपाय नसल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेल व्यवसायावर चार लाख लोक थेट उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.
पुण्यातही युद्धाची धग हॉटेलच्या चुलींना
पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाची धग थेट पुण्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या भटारखान्यात पोहोचली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केला आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका आदरातिथ्य व्यवसायाला बसणार आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे अजिंक्य उडाणे म्हणाले, ‘व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा आहे. रेस्टॉरंट व हॉटेल उद्योग पूर्णपणे एलपीजीवर अवलंबून आहे. मात्र, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. गॅस एजन्सींकडे केवळ एक ते दोन दिवस वितरण करता येईल, एवढाच सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने पेट्रोलियम मंत्रालयाकडे निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.
ऑल इंडिया गॅस वितरक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण खंडाळकर म्हणाले, ‘तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. केवळ घरगुती ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांना केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात सोमवारीही अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सींच्या कार्यालयात गर्दी केली होती.’ दरम्यान, गॅस बुकिंग यंत्रणा विस्कळित असल्याच्या तक्रारी ग्राहक करत होते.
शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




