
पुणे - पुणे महापालिकेत झालेल्या कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचा आरोप होत असताना या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. महापालिकेनेही या तक्रारींची दखल घेऊन चौकशी सुरू केली असून, १० मे पर्यंत याचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेची फसवणूक करून नोकरी मिळविल्याचे स्पष्ट झाले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
पुणे महापालिकेने गेल्या वर्षी ४४८ जागांची भरती केली. त्यामध्ये १३५ जागा या कनिष्ठ अभियंत्यांच्या आहेत. या जागांसाठी तब्बल १२ हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. आॅनलाइन परिक्षेनंतर महापालिकेने ४५० जणांची गुणवत्ता यादी जाहीर करून त्यातून गुणवत्तायादीत पुढे असलेले व कागदपत्रांची पडताळणी करण्यात पात्र ठरलेल्या १३५ जणांची अंतिम निवड करून त्यांना महापालिकेच्या नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला. ही १३५ जणांची यादी जाहीर केल्यानंतर यातील काही उमेदवारांबाबत सेवक वर्ग विभागाकडे प्रत्यक्षात तसेच इमेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या.
महापालिकेने कागदपत्रांची पडताळणी करताना तीन वर्षाचा अनुभवाचा पुरावा म्हणून सादर करण्यासाठी ११ प्रकारची कागदपत्र आवश्यक होते. त्यामध्ये फॉर्म १६, बँक स्टेटमेंट, पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यासह इतर कागदपत्रांचा समावेश होता. त्यामध्ये पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यासारखी कागदपत्र बनावट तयार करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला आहे. तसेच काही जणांनी अभियांत्रिकी डिप्लोमाच्या आधारावर नोकरी मिळवताना त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे हे लपविले आहे. तसेच एका शहरात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेताना दुसऱ्या शहरात पूर्ण वेळ नोकरी केल्याच अनुभवाचा दाखला जोडला आहे. याबाबत सेवक वर्ग विभागाकडे पुराव्यासह तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्याच दरम्यान निवड यादीतील सुमारे ५ ते ६ जणांनी वैयक्तीक कारणास्तव महापालिकेत नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या याचिकांवर आता १० जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, महापालिकेने यासंदर्भात सेवक वर्ग विभागाचे उपायुक्त सचिन इथापे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि मुख्य लेखा परिक्षक अमरिश गालिंदे ही तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.
ही समिती ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, अशांची वैयक्तीक रित्या कागदपत्रांची पडताळणी करत आहे. यामध्ये बनावट कागदपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांना नोकरीतून कमी केले जाणार आहेच, पण महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
‘कनिष्ठ अभियंता प्रकरणी महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, याचा अहवाल १० मे पर्यंत सादर केला जाणार आहे. यात महापालिकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.’
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




