वसई तालुक्यातील जूचंद्र गावात परंपरा जपताना सामाजिक एकोप्याचेही भान जपले जाते. त्याचेच फलित म्हणजे येथील ग्रामस्थ गेली १२५ वर्षे `एक गाव एक होळी` सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या ठिकाणी पाहावयाला मिळते, ती यंदाही अनुभवता येणार आहे. जूचंद्रचे ग्रामस्थ निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांना पसंती देत असले तरी होळीला सर्वांचे एकमत असते. प्रत्येक जण हिरीरीने सहभाग घेत बहारदार होळी कशी साजरी होईल, याकडे लक्ष देतो. त्यामुळेच जूचंद्र गाव होळी सणाला रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघते.
जूचंद्र हे सुमारे ३० हजार लोकवस्तीचे गाव नायगाव पूर्वेला वसले आहे. कलाकारांचे, त्याचबरोबर रांगोळीचे गाव म्हणूनही या गावाची ख्याती आहे. नाटककार, गायक, कवी, लेखक, विविध राजकीय क्षेत्रांतील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते उदयास आले आहेत. या गावात होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विशेष म्हणजे एवढी लोकसंख्या असूनही `एक गाव एक होळी`ची परंपरा आजही या गावाने जपली आहे.
होळी उत्सवात तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. नवविवाहित जोडप्यांना होळीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मान दिला जातो. तसेच गावातील ज्या मुली लग्न होऊन सासरी जातात, त्या होळीच्या दिवशी माहेरी येऊन आनंद द्विगुणित करतात. कोंबड होळी व मोठी होळी असे होलिकोत्सवाचे स्वरूप असते. यावेळी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन सर्व गुण्यागोविंदाने नांदो, सुदृढ आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करतात.
जूचंद्र गावात यंदाच्या होलिकोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी होळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १५ मार्चला विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावेळी आकर्षक बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ७ वाजता नृत्याविष्कार, नाट्यछटा यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. जूचंद्र धार्मिक सेवा संस्थेच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
होळीनिमित्त गाव एकत्र येते. त्यामुळे सामाजिक एकोप्याचे दर्शन होत असते. गावातील ज्येष्ठांपासून ते लहान मुलांचा सहभाग, आनंद पाहण्यासारखा असतो. ग्रामस्थांना एकाच छताखाली आणण्याचे कार्य पूर्वजांनी केले व एक गाव एक होळी संकल्पना प्रत्यक्षात आणली. तीच परंपरा जूचंद्रमध्ये आजूनही जपली जात आहे.
- विनय पाटील, ग्रामस्थ, जूचंद्र.हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
महाराष्ट्र
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
गुन्हा
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
पुणे-सातारा महामार्गावर टेम्पोची जोरदार धडक Pune Accident | पुणे-सातारा
देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'

























Subscribe to my channel

