MHADA काढणार 1200 घरांची लॉटरी; कोकण मंडळ करणार घोषणा

 येत्या महिनाभरात म्हाडा १२०० घरांची लॉटरी काढणार आहे. कोकण मंडळाकडून ही लॉटरी काढली जाणार आहे. या सोडतीतील बहुतांश घरं २०% योजनेतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे स्वस्तातील घरांची सुवर्णसंधी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सोडततीमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक घरं असून, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिविली, वसई विरार या महानगरपालिका हद्दीतील घरांचा या सोडतीमध्ये समावेश असणार आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात खाजगी विकासकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या 20 टक्के योजनांतून ही घरं म्हाडाला मिळालेली आहेत.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *