
Satara Pune Highway Accident : सातारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सातारा-पुणे महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने चहाच्या टपरीजवळ थांबलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सातारा-पुणे महामार्गावरील पारगाव परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृतांमध्ये १५ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-पुणे महामार्गावर पारगाव येथे रस्त्यालगत चहाची टपरी असून बुधवारी रात्री काही प्रवासी तिथे चहा पिण्यासाठी थांबले होते. तिथून जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने टपरीजवळ थांबलेल्या एका कारला धडक दिली. यानंतर ट्रकने तिथे थांबलेल्या आणखी काही वाहनांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हा अपघात ऐवढा भीषण होता, की कारमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १५ वर्षांचा मुलगा आणि एका महिलेचा समावेश आहे. दोघेही शिरुरमधील वडगाव रासई येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी खंडाळा येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेनंतर ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

