
Kasaba-Chinchwad By Election : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी भाडपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. दोन्ही मतदार संघात इच्छूकांची मोठी यादी होती. नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे.
पुण्यातील कसबा-चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचं वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलंच तापलं होतं. या दोन्ही मतदार संघासाठी उमेदवारांची मोठी यादी होती. त्यात कसबा मतदार संघाच मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक याचं नाव अघाडीवर होतं. शिवाय धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्यादेखील नावाची चर्चा होती. आतापर्यंतच पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी पाहता टिळक कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. तसं शैलेश टिळकांनी बोलून दाखवलं होतं. मात्र त्यांना वगळून अचानक उमेदवारीच्या रेस मध्ये असलेले हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
चिंचवड मतदार संघात जगताप कुटुंबातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची भाजपच्या उमेदवारीसाठी घोषणा झाली आहे. या मतदार संघाच्या जागेसाठी सुरुवातीपासून घरातीलच दोघांच्या नावाची चर्चा होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि लहान बंधू शंकर जगताप यां दोघांपैकी एकाची उमेदवारीसाठी वर्णी लागणार होती. त्यात पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतले होते. शिवाय त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या समर्थकांमध्येही दोन गट पडल्याचं दिसून आलं. समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टरदेखील शेअर करण्यात आले होते. त्यात "आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा" असा आशय लिहिण्यात आला होतं.
अश्विनी जगताप कोण आहेत?
अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मुळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहे
कोण आहेत हेमंत रासने?
हेमंत रासने हे पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे भाजपचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते. पुण्याच्या विकासासाठी त्याचं मोठं योगदान आहे.
शहर
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
महाराष्ट्र
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
गुन्हा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला


























Subscribe to my channel

