
पुणे : मंडईतील रामेश्वर चौक परिसरात वैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार करुन पसार झालेल्या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेने पकडले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या प्रकरणी रूपेश राजेंद्र जाधव (वय २४, रा. कुंभारवाडा, नाना पेठ), प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ येमूल (वय २२, रा. नाना पेठ), बाळकृष्ण विष्णु गाजुल (वय २४, रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली. गोळीबारात शेखर अशोक शिंदे (वय ३२) जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
गजबजलेल्या मंडई भागात दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या दरम्यान दुचाकीस्वार शेखरला अडवून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली होती. पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट एककडून शोध घेण्यात येत होता. आरोपी रुपेश आणि साथीदार प्रथमेश कोंढवा भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार बाळकृष्ण याला मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. आरोपींकडून पिस्तुल जप्त करण्यात आले.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संदीप भोसले, अजय थोरात, अमोल पवार, अनिकेत बाबार, निलेश साबळे, तुषार माळवदकर आणि पथकाने ही कारवाई केली. तपासात आरोपींनी अक्षय वल्लाळ याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. वल्लाळ याचा किशोर शिंदे आणि साथीदारांनी नाना पेठेत खून केला होता. वल्लाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल याने कट रचून किशोरचा भाऊ शेखर याच्यावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




