
Maharashtra-Karnataka Border Dispute : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. या सीमावादावर आता शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत ठराव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत ठरावाचं वाचन करण्यात आलं. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव तत्काळ मंजूर केला. सीमावादाचा हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही, असं या ठरावात मांडण्यात आलं आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्राच्या विधानसभेने कर्नाटक प्रशासनाच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
सोमवारी सीमाप्रश्नी ठराव सादर न झाल्याने विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी शिंदे-भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. उद्धव ठाकरे सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नी ठरावा सोमवारी अथवा मंगळवारी सादर होईल असे म्हटले होते.
त्यानंतर आज विधानसभेत ठराव सादर करण्यात आला. राज्य सरकारने सादर केलेल्या ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दुरुस्ती सूचना केल्या ठरावात बेळगाव, निपाणी, भीदर या शहरांचा उल्लेख ठरावात आवर्जून करण्याची मागणी त्यांनी केली.
ठराव हा आगामी काळात कायदेशीर लढाईतही महत्त्वाचा ठरू शकतो, याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी ही सूचना केली. त्याशिवाय, या ठरावातील वाक्यरचना, व्याकरण दुरूस्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या सूचनांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शहर
- पादचाऱ्यांचा मोठा विजय! रस्त्यावर सुरक्षित चालणे हा आता 'मूलभूत हक्क'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
महाराष्ट्र
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
- नांदेड : अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून , पत्नी आणि प्रियकराने मृतदेह पुरून रचला हत्येचा थरार.
गुन्हा
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
























Subscribe to my channel




