धुळे : जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान असवैधानिक शब्द उच्चारल्याबद्दल निलंबन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांतर्फे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर करून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावला आहे. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी तीव्र घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *