पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना

पुणे : सदनिकेत प्लंबिगचे काम करताना विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. दयानंद तारक बनसोडे (वय ३९, रा.वनलिका सोसायटी, लवळे फाटा, पिरंगुट) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बनसोडे यांचा भाऊ अजित (वय ३६) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्लंबिग ठेकेदार विनित गोविंद गाडगीळ (वय ५५, रा. कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारजे भागातील व्होयला सोसायटीत एका सदनिकेत दयानंद बनसोडे प्लंबिंगचे काम करत होते. त्या वेळी प्रसाधनगृहात विजेचा धक्का बसल्याने बनसोडे गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बनसोडे यांना सुरक्षाविषयक साहित्य न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदार विनीत गाडगीळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *