
पिंपरी-चिंचवड : राजकीय इच्छाशक्ती आणि निधीअभावी गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड न्यायालय इमारत उभारणीच्या प्रकल्पाला आता चालना मिळणार आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) यासाठी १०५ कोटी ७७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.शिवाजीनगरच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायालयासाठी प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे. नऊ मजली इमारतींचा हा प्रकल्प मोशी प्राधिकरणातील १६ एकर जागेत करण्याचे निश्चित झाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ४ मजले आणि २६ कोर्ट हॉल उभारण्यात येणार आहेत.
अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा आदी आवश्यक सुविधा येथे असणार आहेत. या प्रकल्पासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नव्हता म्हणून या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. तथापि, शुक्रवारी राज्य शासनाने १०५ कोटी ७७ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिल्याने आता न्यायालयाच्या कामाला चालना मिळणार आहे. यासंदर्भात आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेनदर फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. १९८९ मध्ये पिंपरी-चिंचवड न्यायालयाची स्थापना झाली. अद्याप नव्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला नाही. निधी अभावी प्रकल्प प्रलंबित होता. आमदार लांडगे यांचा पाठपुरावा आणि राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे न्यायालय उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




