
पुणे : खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकाही होत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ज्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसलेले दिसत आहेत ते मुख्यमंत्र्यांचं घर आहे. कुणाच्या घरात कुणी कोणत्या खुर्चीवर बसावं हा शेवटी त्या घरातील अंतर्गत प्रश्न आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (२३ सप्टेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “ते मुख्यमंत्र्यांचं घर आहे. मात्र, मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर केवळ मुख्यमंत्रीच बसतात. आम्हीही ते अनेक वर्षे अनुभवत आहोत. उद्या कुणाच्या घरात कोणत्या खुर्च्या ठेवल्या आहेत, त्यावर कोणी बसावं कोणी बसू नये हा शेवटी घरातील अंतर्गत प्रश्न आहे. ती खुर्ची मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणून ठेवली गेली नसेल.”
“घरात मुलं असतात, सुना असतात, भाऊ असतात किंवा इतर लोक असतात. या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो आहे.”
अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही पालकमंत्री असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांच्या कार्यालयात बसण्याचा अधिकार असतो. हा अधिकार मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असेल तर असतो.”
“श्रीकांत शिंदेंबाबत नक्की काय झालं आहे याबाबत खासदार शिंदेंनी माहिती दिल्याशिवाय स्पष्टता येणार नाही. ज्याने त्याने ज्या त्या नियमांचं पालन केलं पाहिजे,” असंही पवारांनी नमूद केलं.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




