महाराष्ट्रातील कऱ्हाड, जुन्नर आणि संगमनेरमधील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रगत शेतकरी आणि तज्ज्ञ संस्थांच्या सहभागातून सोडवला जाऊ शकतो. राजस्थानच्या समुदाय-आधारित मॉडेलच्या धर्तीवर अधिवास व्यवस्थापन, पूर्वसूचना प्रणाली आणि संवेदनशील शेती पद्धती राबवल्यास सहअस्तित्वाचा शाश्वत मार्ग निर्माण होऊ शकतो. दरवर्षी 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा होतो. तो साजरा करताना आपण नेहमी संरक्षण, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल याबद्दल बोलतो. मात्र, आजच्या घडीला सर्वात ज्वलंत प्रश्न आहे तो मानव-वन्यजीव संघर्षाचा. हा संघर्ष केवळ वन्यजीवांचा नाही आणि तो फक्त ग्रामीण भागापुरताही मर्यादित नाही; तर तो विकास, शेती, उपजीविका आणि पर्यावरण यांच्यातील समतोल बिघडल्याचे संकेत देतो. वन्यजीवांना पकडणे किंवा स्थलांतरित करणे हा तात्पुरता मार्ग ठरतो; मात्र तो दीर्घकालीन तोडगा नाही. म्हणूनच राजस्थानमध्ये राबवण्यात आलेल्या समुदाय-आधारित सहअस्तित्वाच्या मॉडेलकडे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधून संघर्षाचे व्यवस्थापन करण्यात यश आले आहे. या पद्धतीमध्ये वन्यजीवांना बाहेर ढकलण्याऐवजी त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी जीवन अधिक सुरक्षित कसे करता येईल यावर भर देण्यात आला. मानव-वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचा मार्ग महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. गीर फॉरेस्ट, राजस्थानच्या उदयपूरमधील झालाना आणि आम्रगड या ठिकाणी घनदाट जंगल नसून शेती आणि गवताळ प्रदेश आहेत. त्या ठिकाणी बिबट्यांचे दर्शन घडवण्यासाठी 30 ते 40 मोठी रिसॉर्ट्स असून, त्यातून दरवर्षी 150 कोटींचे उत्पन्न मिळते. तसेच एक हजारापेक्षा जास्त लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे वेतन मिळते. बिबट्यांना पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणे आणि फोटोग्राफीसाठी त्यांना प्रोत्साहित करणे, याद्वारे रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. ऊस पिकापेक्षा जास्त उत्पन्न त्या भागातील शेतकऱ्यांना बिबट सफारीद्वारे मिळाले असून, परदेशी पर्यटकही तेथे मोठ्या संख्येने येतात. मानव-बिबट सहजीवनाद्वारे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणारा हा प्रकल्प पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कऱ्हाड (सातारा), संगमनेर (अहिल्यानगर) आणि जुन्नर (पुणे) येथील पथक लवकरच तेथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. त्या निमित्ताने आपल्या राज्यात निर्माण झालेला मानव-बिबट संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे राज्यात निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आहे. माळरान ही केवळ पडीक जमीन आहे, असा लोकांचा दृष्टिकोन असतो. रस्ते, गोदामे किंवा बेघरांसाठी घरे बांधणे यांसह इतर कामांसाठी जमिनीचा वापर होतो. वनांचे संवर्धन महत्त्वाचे असून, जंगलाचे महत्त्व आणि त्याबाबतची जागरूकता लोकांमध्ये बऱ्यापैकी निर्माण झाली आहे. पण, त्या तुलनेत गवताळ माळरानाबाबत नकारात्मकता आहे. प्रत्यक्षात ज्या परिसरात पाऊस कमी असल्याने जंगल निर्माण होऊ शकत नाही, अशा ठिकाणी माळराने तयार झाली आहेत; ही निसर्गाची किमया आहे. या जमिनी निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्यात लवकरच 300 कोटी झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये गवताळ माळराणाचे पर्यावरणीय स्थान कायम राखण्यासाठी त्या विशिष्ट भागांत वृक्षारोपण केले जाणार नाही, असे कृती धोरण निश्चित केले आहे. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि साताऱ्याच्या काही भागांतील गवताळ माळराणांचे नैसर्गिक अधिवास कायम राखले जातील. गवताळ माळरानाचा राजा अशी उपाधी असणारा माळढोक पक्षी संकटग्रस्त प्रजातीमध्ये आहे. या पक्षांचे पुनर्वसन करण्यासाठी माळराने समृद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. अधिवास जपल्याशिवाय या पक्षांचे पुनर्वसन किंवा कृत्रिम प्रजनन करूनही फायदा होणार नाही. त्यासोबतच तणमोर (लेसर फ्लोरिकन) यांचेही संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



