कोणताही व्यावसायिक दुकानांमध्ये विक्रीसाठी रंग, पिचकारी ठेवत नाही. होळीच्या दिवशी गावात केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन पुरणपोळी सारखे गोडधोड पदार्थही केले जात नाहीतदरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी, रंगांचा सण धुलिवंदन साजरा केले जाते. सोमवारी देशातील अनेक भागात होलिका दहन करण्यात आले. पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एक असं गाव आहे जेथे ७५ वर्षांपासून होळी पेटवण्यात आली नाहीये, ना येथे कोणी रंगपंचमी खेळली आहे. Holi Party 2026 : होळी पार्टीसाठी घरीच बनवा खुसखुशीत समोसे, रंग खेळून आल्यावर करा पोटभर नाश्ताराज्यात होलिका दहन नंतर रंगपंचमी वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद गावात गेल्या ७५ वर्षांपासून होळीचा सण साजरा करण्यात आला नाहीये, ना येथे रंगपंचमी खेळण्यात आली. इतकेच नाही घरात पुरणपोळी सारखे गोडधोड पदार्थही केले जात नाहीत. ना गावातील कोणत्याही दुकानांमध्ये विक्रीसाठी रंग, पिचकारी ठेवली जाते. होळी का साजरी केली जात नाही. नेमकं कारण का आहे? हे जाणून घेण्याचं कुतूहल तुम्हाला जसे आहे, तसेच आम्हाला होते. या कुतूहलापोटी गावातील लोकांशी चर्चा केली. त्यावेळी एक अनोखं कारण गावकऱ्यांनी सांगितलं. Holi 2026: होळी खेळताना मोबाईल फोनची काळजी कशी घ्याल? पिंपळोद गावचे आराध्य दैवत परमहंस संत परसराम महाराज आहेत, त्याची शिकवणीमुळे येथील गावकरी होळी आणि रंगपंचमी साजरे करत नाहीत. १९५१ साली होळी पोर्णिमेला परमहंस संत परसराम महाराज याचे देहावसान झाले. त्या दिवसापासून या गावात होळी, रंगोत्सव साजरा केला जात नाही. होळीच्या दिवशी गावात केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु होळी खेळली जात नाही. आयटीआय महाविद्यालय पिंपळोदचे प्राचार्य राजेश वाघजाळे, याबाबत माहिती दिली की, १९५१ साली गावाचे आराध्य दैवत परमहंस संत परसराम महाराज यांचे निधन झाले होते. त्यावेळी होळी पोर्णिमा होती. तेव्हापासून गावकरी होळी आणि रंगपंचमी खेळत नाही. होळीच्या दिवसापासून परसराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे. यंदाचा ७५ वा पुण्यतिथी महोत्सव आहे. गेल्या ७५ वर्षापासून गावकरी होळी पेटवत नाहीत ना रंगाचे खेळतात. पण पुण्यतिथी महोत्सवाच्या काळाथ धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते. कौस्तुभ घोम गावतील एक तरुण आहे, त्याने दिलेल्या माहितीनुसार, गावकरी फक्त हरिनामाची होळी खेळली जाते. ७५ वर्षापासून होळी आणि रंगपंचमी खेळली जात नाही. आम्हाला होळी काय असते आणि रंगपंचमी काय असते, हे सुद्धा माहिती नाहीये. परमहंस संत परसराम महाराज यांनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला होता. गावातील दुकानदार सुद्धा पिचकारी किंवा रंग विक्रीला ठेवत नाहीत.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राज्यातील कारागृह प्रशासनाचा कणाच खिळखिळा; १२ वर्षांपासून 'तुरुंगाधिकारी श्रेणी-२'ची भरती ठप्प, ७० टक्के पदे रिक्त!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान केलं आहे.
पुणे-सातारा महामार्गावर टेम्पोची जोरदार धडक Pune Accident | पुणे-सातारा
देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'


























Subscribe to my channel


