]
औरंगाबाद : गायरान जमिनीच्या वादातून दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणत वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचे घाव घालून गुरुवारी (ता.१८) निर्घृण खून करण्यात आला होता. जनार्दन कोंडिबा कसारे (५६, रा. साईनगर, पिसादेवी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील सहापैकी चार आरोपींना ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्या पथकासह चिकलठाणा पोलिसांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
शिवाजी महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, महादू गंगाराम औताडे आणि भरत महादू औताडे (रा. सर्व हर्सूल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाळू महादू औताडे आणि बबन निवृत्ती रोडे हे दोघे आरोपी सध्या फरार आहेत.
पिसादेवी परिसरात नऊ एकर गायरान जमीन आहे. तब्बल ३५ वर्षांपासून नऊ एकरांपैकी आठ एकर जमीन जनार्दन कसत होते. तसेच एक एकर जमीन ही महादू गंगाराम औताडे याच्या ताब्यात आहे. या जमिनीवरूनच २००८ मध्ये आणि त्यानंतर कसारे आणि औताडे कुटुंबामध्ये वाद झाला होता. तेव्हा या प्रकरणात औताडे विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जनार्दन कसारे यांच्यावर १८ ऑगस्ट रोजी दुपारी कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला, त्यानंतर त्यांना तातडीने रिक्षाने घाटीत दाखल केले होते. रात्री नऊ वाजेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनार्दन यांना मृत घोषित केल्याचे डीवायएसपी तथा तपास अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले. सहाही आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत जनार्दन कसारे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कसारे कुटुंबीयांसह नातेवाईक, विविध संघटनांनी घेतला होता. अखेर काही मागण्या मान्य केल्याने कसारे यांचा मृतदेह दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान स्वीकारला. मृतदेहावर साडेचार वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत जनार्दन यांना दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




