पुणे : हृदयद्रावक! शॉक लागून बाप-लेकासह चार जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील भोरमध्ये एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. विजेचा शॉक लागून बाप लेकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. भोर तालुक्यातील निगेडे गावातील ही घटना घडली आहे.

नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागल्याने या चौघांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चारही व्यक्ती गावातील बंधाऱ्यामध्ये मोटार बसवण्यासाठी गेले असताना विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बाप लेकासह चौघेजण आहेत.

गुंजवणी नदीच्या पात्रात पाण्यात मोटार सोडत असताना शॉक लागला आणि ही दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय 45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय 55), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36) अशी चौघांची नावं आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *