तसे तर मी नवी दिल्लीतील रस्ते, पुतळे आणि इमारतींमध्ये सरकारने केलेल्या प्रत्येक बदलाचे समर्थन करत नाही. उदाहरणार्थ, राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ का केले गेले, हे मला समजत नाही. मुघल गार्डन्सचे नाव बदलून अमृत उद्यान का केले गेले, हेही मला उमजलेले नाही, कारण ते उद्यान मुघल शैलीतच बांधलेले आहे. परंतु या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एडविन लुटियन्सच्या जागी सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तेव्हा मला खूप आनंद झाला. लुटियन्स हे नक्कीच एक प्रतिभावान वास्तुविशारद राहिले असतील, पण ते निःसंशयपणे वर्णद्वेषी होते. भारतीयांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा तिरस्कार होता, जो त्यांनी कधीही लपवून ठेवला नाही. याचा सबळ पुरावा 1985 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द लेटर्स ऑफ एडविन लुटियन्स टू हिज वाइफ लेडी एमिली’ या पुस्तकात मिळतो. भारतातील कोणतीही गोष्ट लुटियन्सला प्रभावित करू शकली नव्हती - ना वास्तुकला, ना तत्त्वज्ञान, ना संस्कृती आणि येथील लोकांच्या त्वचेचा रंग तर मुळीच नाही. इंदूरच्या डेली कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना एका वर्णद्वेषी शब्दाने संबोधित केले होते. वाराणसीत त्यांना असे आढळले की येथे ‘सर्व काळे लोक, सर्व प्रकारचे काम करतात’. मद्रासच्या लोकांसाठी तर त्यांनी अधिक अभद्र टिप्पणी केली. त्यांनी लिहिले की, ‘भारताच्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही.’ भारतीय धर्मांत त्यांना कोणतीही बौद्धिकता दिसली नाही. आपल्या खाजगी कर्मचाऱ्यांच्या नावांवरही ते टोमणा मारण्यास विसरले नाहीत. ते म्हणाले, ‘हे लोक त्या सर्व हालचाली करतात, ज्यामुळे कोणताही गोरा साहेब कंटाळू शकतो.’ भारतीय वास्तुकलादेखील त्यांना प्रभावित करू शकली नाही. वाराणसीच्या घाटांच्या काठावरील मंदिरे त्यांना ‘मुलांच्या खेळण्यांमधील झाडांसारखी’ वाटली. कुतुबमिनारची घडण त्यांच्या मते निष्काळजी आणि बेढब होती. मुंबईतील होळकरांचा राजवाडा त्यांना अभद्र व उदयपूरचा राजप्रासाद त्यांना आदिम वाटला होता. ताजमहाललाही त्यांनी नाकारले. तो ग्रीक व रोमन कलाकृतींच्या जवळपासही टिकत नाही, असे म्हटले. शिल्पकारांबद्दल त्यांची टिप्पणी होती की, ‘यांना ओबडधोबड नमुने व देवमूर्ती बनवण्याशिवाय काहीच येत नाही.’ एका बांधकामाच्या अंतिम टप्प्यात कामाची पाहणी करताना त्यांनी लिहिले की, ‘निष्काळजी भारतीय नेहमीप्रमाणे गोष्टी वाया घालवत होते आणि गोंधळ पसरवत होते.’ त्यांना आपल्या पत्नीसाठी बुद्धमूर्ती खरेदी करायची होती, पण त्यांना काहीही दर्जाच्या अनुरूप वाटले नाही. त्यांनी लिहिले - ‘हे देवा, येथे सर्व काही किती कुरूप आहे!’ इतकेच काय, राष्ट्रपती भवनाचा भव्य घुमटदेखील लुटियन्सने अशा प्रकारे कल्पिला होता की, तो ‘ब्रिटिश सैनिक, अधिकारी, मिशनरी किंवा व्हाइसरॉयच्या टोपी घातलेल्या डोक्याची प्रतिमा’ निर्माण करेल, तर लुटियन्सचे समर्थक याला भारतीय वास्तुकलेतून प्रेरित असल्याचे सांगतात. या सर्व अवतरणांवरून स्पष्ट होते की, आपण भारतीय आणि आपल्या महान सभ्यतेबद्दल लुटियन्सची वृत्ती एका अशिक्षित, दुष्ट बुद्धीच्या आणि वर्णद्वेषी व्यक्तीसारखी होती. अशा परिस्थितीत खुद्द राष्ट्रपती भवनात लुटियन्सचा पुतळा असणे हे आपल्या वसाहतवादी विस्मृतीचे एक दयनीय प्रतीक होते. हे पूर्णपणे योग्य आहे की आता लुटियन्सचा पुतळा हटवून त्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर-जनरल होते. राजाजी हे एक सच्चे गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांना मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रीमियर, पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून व्यापक राजकीय-प्रशासकीय अनुभव होता. ते विचारवंत आणि लेखकही होते. त्यांचे साहित्यिक योगदान - ज्यात रामायण आणि महाभारताच्या अनुवादांपासून ते संस्कृती आणि राजकारणावरील वैचारिक निबंधांपर्यंतचा समावेश आहे - भारतीय बौद्धिक परंपरेला अधिक समृद्ध करते. आपण असे प्रजासत्ताक आहोत, ज्याला आपली सार्वजनिक स्मृती आपल्याच मातीत रोवायची आहे. आपण सरकारचे या निर्णयासाठी अभिनंदन करायला हवे, जो निर्णय वसाहतवादी इमारती बांधणाऱ्याच्या ऐवजी राष्ट्राच्या अंतर्मनाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या स्मृतीला समर्पित आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लुटियन्स दिल्लीचा एक पैलू हादेखीलहे पूर्णपणे योग्य आहे की, लुटियन्सचा पुतळा हटवून त्या सी. राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर जनरल होते. ते एक सच्चे गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

