नाशिक: पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पार्श्वभूमीवर नाशिक शहराने जागतिक पातळीवर एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आणि कुंभपर्वाच्या मुहूर्तावर गोदाकाठी झालेल्या अभूतपूर्व सामूहिक शंखनादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या भव्य सोहळ्यात तब्बल ५१७ गोदाप्रेमी व शंखवादकांनी सलग साडेपाच मिनिटे एकाच वेळी शंखनाद करत नवा 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness World Record) प्रस्थापित केला आहे. या विश्वविक्रमामुळे अमेरिकेचा मागील जुना विक्रम मोडीत निघाल्यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
यापूर्वी एकाच वेळी सर्वाधिक शंखनाद करण्याचा जागतिक विक्रम अमेरिकेच्या नावावर होता, जिथे ३०३ जणांनी एकत्र शंख फुंकले होते. मात्र, नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात १२ ते ८२ वयोगटातील तब्बल ५१७ गोदा सेवकांनी हा जुना विक्रम मागे टाकत नव्या विक्रमाला गवसणी घातली. या कार्यक्रमासाठी चेन्नई येथून विशेष व प्रमाणित शंख मागविण्यात आले होते.
भक्तिमय वातावरणात 'शंखनाद' आणि जयघोष कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्राणायामाने शंख फुंकण्याच्या तयारीने झाली. त्यानंतर उपस्थितांनी आणि वादकांनी "गजानना गजानना बाप्पा गजानना", "जय भवानी, जय शिवाजी" तसेच "भारत माता की जय" असा एकच जोरदार जयघोष केला. या भव्य शंखनादाच्या सुरावटीने आणि निनादाने संपूर्ण गोदाकाठ दुमदुमून गेला. दर बारा वर्षांनी गोदातीरी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जणू साक्ष देणारी ही दुंदुमी आसमंतात गुंजत राहिली. या विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'चे वरिष्ठ निर्णायक आणि प्रतिनिधी ऋषी नाथ यांनी प्रत्यक्ष मंचवरून केली, तेव्हा उपस्थित हजारो नाशिककरांनी एकच जल्लोष केला.
कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक वातावरणनिर्मिती येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीचा हा उपक्रम कुंभपर्वाच्या वातावरणनिर्मितीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पायाभूत टप्पा ठरला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण (NTKMA) आणि गुणगौरव न्यास संचालित अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त पुढाकारातून हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. याप्रसंगी बोलताना प्राधिकरणाचे अधिकारी व नेत्यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे भारतीय प्राचीन संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि लोकसहभागाची ताकद संपूर्ण जगासमोर प्रभावीपणे प्रदर्शित झाली आहे. या अभूतपूर्व शंखनादानंतर संध्याकाळी गोदावरीच्या तीरावर भव्य गोदा आरती करण्यात आली, ज्याने या ऐतिहासिक सोहळ्याची अत्यंत मंगलमय वातावरणात सांगता झाली.
शहर
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- मुंबई: व्हीईएससीओएमध्ये डॉ. आनंद आचारी देत आहेत आर्किटेक्चुरल शिक्षणाला नवी दिशा; नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक शिक्षणावर भर!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
महाराष्ट्र
- नागपुर: मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत १६ अपक्ष उमेदवारांचे मानकापूर क्रीडा संकुलात आंदोलन!
- मुंबई: विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हाच विरोधकांचा एकमेव अजेंडा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल!
- उल्हासनगर: लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर उल्हासनगर महापालिकेची मोठी घोषणा; ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजने'तून विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६ हजार रुपये!
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
गुन्हा
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात पोहोचले; प्रतिज्ञापत्रातून मांडली सविस्तर भूमिका!
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला


























Subscribe to my channel




