
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ११ दिवसांपासून कोसळणारा दमदार पाऊस सोमवारीही कायम होता. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये तब्बल १.२८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ९.४७ टीएमसी म्हणजेच ३२.४८ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये ८.६३ टीएमसी म्हणजेच २९.६२ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ०.८४ टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे सोमवारी प्रथमच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा जास्त झाला. तसेच खडकवासला धरणात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरूच असल्याने या धरणातून रात्री ११.३० नंतर ८५० क्युसेक वेगाने मुठा नदीतपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. रविवारी सायंकाळपर्यंत या चारही धरणांमध्ये ८.१९ टीएमसी म्हणजेच २८.११ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत हा पाणीसाठा ९.४७ टीएमसीपर्यंत पोहोचला. पुढील पाच दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात या काळात मुसळधार पाऊस पडून समाधानकारक पाणीसाठा जमा होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात ७५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात ७४ मि.मी., पानशेत धरण परिसरात ८५ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ६० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ७५ आणि ८४ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात २२ मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये
टेमघर ०.६८ १८.२९
वरसगाव ३.८५ ३०.००
पानशेत ३.४५ ३२.४१
खडकवासला ०.४९ ७५.६०
एकूण ९.४७ ३२.४८
खडकवासला धरणातून रात्री उशीरा विसर्ग
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने सोमवारी सायंकाळी भरले. त्यामुळे या धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून १००५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहता रात्री ११.३० नंतर मुठा नदी पात्रात ८५६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडाळकर यांनी सांगितले.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
- सातारा: जेजुरीला निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्या ट्रकला धडक; आजोबा-नातीचा जागीच मृत्यू.
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'



























Subscribe to my channel


