भारतीय टेलिव्हिजनचा इतिहास: ना क्राउन, ना ओनिडा, ना बीपीएल; कानपूरच्या 'या' कंपनीने बनवला होता देशातील पहिला टीव्ही!

भारतात जेव्हा टेलिव्हिजनचा (Television) इतिहास काढला जातो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर क्र्राउन (Crown), ओनिडा (Onida), बीपीएल (BPL) किंवा डेलडा यांसारख्या जुन्या आणि लोकप्रिय ब्रँड्सची नावे येतात. ९० च्या दशकात किंवा त्याआधी घरोघरी हेच टीव्ही पाहायला मिळायचे. मात्र, बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, भारतातील पहिल्यावहिल्या टेलिव्हिजनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये कोणत्याही परदेशी किंवा मोठ्या ब्रँडचे नाव नाही, तर उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील एका स्वदेशी कंपनीने देशातील पहिला टीव्ही बनवण्याचा मान मिळवला होता.

इतिहासानुसार, १९६९ च्या सुमारास कानपूरच्या 'जे.के. इलेक्ट्रॉनिक्स' (J.K. Electronics) या कंपनीने भारतात सर्वप्रथम 'जे.के. टीव्ही' (J.K. TV) च्या माध्यमातून स्वदेशी बनावटीचा टेलिव्हिजन तयार केला होता. त्या काळी जेव्हा भारतात तंत्रज्ञानाचा विकास प्राथमिक टप्प्यात होता आणि बहुतांश गोष्टींसाठी परदेशावर अवलंबून राहावे लागत होते, अशा काळात कानपूरच्या या उद्योगाने देशांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक स्वरूपात टीव्ही निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवली होती. हा टीव्ही त्या काळातील लोकांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरला होता. आजच्या आधुनिक स्मार्ट टीव्ही आणि एलसीडी-एलईडीच्या युगात अनेक जण जुन्या काळातील या सुवर्ण इतिहासाला विसरले आहेत, परंतु भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीच्या प्रवासात कानपूरच्या जे.के. इलेक्ट्रॉनिक्सचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *