पिंपरी-चिंचवड शहरात आधीच दिवसाआड आणि अपुरा पाणीपुरवठा होत असताना, आता नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाल्याने आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने, वर्षभराचे जलनियोजन डोळ्यासमोर ठेवून १६ ऑक्टोबरपासून शहरात आणखी दहा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आधीच शहरात १०५ एमएलडी पाण्याची तूट असताना या नवीन पाणीकपातीमुळे नागरिकांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रामुख्याने मावळातील पवना धरणातून ५४० एमएलडी, आंद्रा धरणातून ९५ एमएलडी आणि एमआयडीसीकडून ३० एमएलडी असा मिळून एकूण ६६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात आधीच दिवसाआड पाणीपुरवठा योजना सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्यामुळे आणि पाऊस लांबल्यामुळे जलसंपदा विभागाने सुरुवातीला १५ टक्के पाणी कपात केली होती. मात्र, जुलै महिन्यात समाधानकारक व जोरदार पाऊस झाल्यानं पवना आणि आंद्रा ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली होती. त्यावेळी ही कपात मागे घ्यावी, अशी मागणी महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. परंतु, जलसंपदा विभागाने ती कपात मागे घेतली नव्हती.
आता एल निनोच्या प्रभावामुळे आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने आणखी १० टक्के पाणी कपात वाढविण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
वाकडमधील ३४ सोसायट्यांना ५० टक्केच पाणी: शहरात दैनंदिन वापरासाठी ७७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ६६५ एमएलडी एवढाच पुरवठा होत आहे. म्हणजेच मागणीपेक्षा तब्बल १०५ एमएलडी पाण्याची तूट कायम आहे. या तुटीचा सर्वाधिक फटका वाकड परिसराला बसत आहे. वाकडमधील २०० ते ५०० सदनिका असलेल्या तब्बल ३४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेकडून केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या सोसायट्यांमधील रहिवाशांना पाण्यासाठी पूर्णपणे टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, आम्हाला शंभर टक्के पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सोसायटीधारकांकडून केली जात आहे.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याबाबतचे राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार लवकरच महापालिकेला याबाबतचे अधिकृत पत्र पाठविण्यात येणार आहे. दुसरीकडे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सध्या मागणीच्या तुलनेत आधीच कमी पाणी मिळत आहे आणि १६ ऑक्टोबरपासून धरणातून जेवढे पाणी उपलब्ध होईल, त्यानुसार पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. महापालिकेला पत्र मिळाल्यानंतर यावर अधिकृत अंतिम आराखडा तयार केला जाईल.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



