कोल्हापूर/राधानगरी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यातच काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते तथा आमदार सतेज पाटील यांच्या गोटात एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. गोकुळ दूध संघाचे माजी संचालक किसन चौगले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसोबत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ला जाहीर पाठिंबा देत अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे महायुतीला, विशेषतः मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशा स्थितीत राधानगरी तालुक्यात पारंपारिक राजकीय समीकरणांना खिंडार पाडत किसन चौगले यांनी समविचारी आघाडीची हातमिळवणी केली आहे. या पक्षप्रवेशानंतर आमदार सतेज पाटील यांनी गोकुळच्या आगामी निवडणुकीसाठी किसन चौगले यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केली आहे. यामुळे राधानगरी तालुक्यातील सहकार व राजकीय क्षेत्राचे संपूर्ण समीकरणच बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या राजकीय घडामोडीमुळे एका बाजूला सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील समविचारी आघाडीचे स्थानिक पातळीवर पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रवेश एक गेमचेंजर ठरू शकतो, कारण किसन चौगले यांच्या सोबत जोडलेल्या कार्यकर्त्यांचे जाळे आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क निवडणुकीत मोठा प्रभाव पाडणारा ठरेल यात शंका नाही.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
- पुणे: एमपीएससी आंदोलन लांबले तर मी स्वतः येईन...; नाना पाटेकरांनी पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी दिलेला शब्द; रोहित पवारांनी सांगितली अखेरची आठवण!
महाराष्ट्र
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप























Subscribe to my channel




