कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सव २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता अन् दागिन्यांना व पूजेच्या साहित्याला सुवर्ण-चांदीची झळाळी!

कोल्हापूर: आराध्य दैवत आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या स्वागताची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने संपूर्ण मंदिर परिसर आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या नित्य आणि विशेष धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे प्राचीन सोन्याचे अलंकार, चांदीचे साहित्य तसेच गर्भगृहाची विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली आहे. यामुळे देवीचे दागिने आणि पूजासाहित्य लख्ख चमकू लागले आहेत.

गाभाऱ्याची स्वच्छता आणि मूर्ती संरक्षणाची विशेष परंपरा: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, मंदिर प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यादरम्यान सकाळी आठ वाजता होणाऱ्याित्य अभिषेक विधीनंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीला सुरक्षेसाठी 'इरलं' पांघरण्यात आले (इरल्याच्या छायेखाली मूर्ती ठेवली गेली). त्यानंतर श्रीपूजक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सहकार्य करणाऱ्या आय स्मार्ट कंपनीच्या वतीने गाभाऱ्याची सखोल स्वच्छता करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या स्वच्छता सत्रानंतर सायंकाळी सहा वाजल्यानंतर मूळ मूर्तीचा पुन्हा अभिषेक व आरती करण्यात आली, त्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले.

अलंकार आणि चांदीच्या साहित्याला लक्ख झळाळी: वर्षातून एकदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या खजिन्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक दागिन्यांची स्वच्छता केली जाते. अंबाबाईच्या खजिन्यात आदिलशाही काळ, यादव आणि शिलाहारकालीन अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान दागिने आहेत. सोन्याचे किरीट, चाफेकळी हार, गदा, पावले, चिंचपेटी, बोरमाळ, कंठी, मंगळसूत्र, नथ, कुंडले, मोहराची माळ, चंद्रहार यांसारखे सोन्याचे नित्य दागिने आणि विशेष प्रसंगी वापरले जाणारे रत्नजडित अलंकार नैसर्गिक साधनांचा ( जसे की रिठे आणि वाळू) वापर करून अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ केले जातात.

याशिवाय मंदिर आवारातच अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या सर्व चांदीच्या वस्तूंनादेखील लख्ख झळाळी देण्यात आली आहे. यामध्ये देवीची चांदीची पालखी, गणपतीची मूर्ती, चांदीची उत्सव मूर्ती, अभिषेकाची पात्रे, पादुका, तांब्या, ताट, ताम्हण, घंटा, समई, चौऱ्या, मोर्चेल, पळी, पंचपात्र आणि विविध दिव्यांची स्वच्छता करण्यात आली. श्रीपूजक गजानन कवठेकर, आनंद कवठेकर, संकेत पोवार, उमेश लाड, महेश कडणे, शैलेश इंगवले, उदय लाड, आकाश लाड, अंकुश सावंत आणि अन्य कारागिरांनी हे अतिशय कष्टाचे व पवित्र काम पूर्ण केले.

भाविकांसाठी जय्यत तयारी व सुरक्षा व्यवस्था: नवरात्रोत्सवात येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या रांगांचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेण्यात आली असून, तिथे भव्य दर्शन मंडप उभारण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नियंत्रण कक्ष (Control Room) आणि चप्पल-बूट सांभाळण्यासाठी विशेष स्टॅन्डची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर आणि बाह्य भागात ११६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची घमईम नजर असणार असून, बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टर आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *