अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य

Rising cases of women's suicides: A growing concern in Uttar Pradesh |  MorungExpress | morungexpress.comअहिल्यानगर: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात काल सोमवारी हृदयद्रावक घटना घडली. गणेशनगर येथील राहत्या घरात विवाहित महिला आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. वंदना गणेश गाडे (वय ३५), चैतन्य गणेश गाडे (वय ७ वर्ष) आणि जीवन गणेश गाडे (वय ३ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

तिघांच्या मृत्यूने देवळाली प्रवरा शहर सुन्न
एकाच घरातील तिघांच्या मृत्यूने देवळाली प्रवरा शहर सुन्न झालं आहे. काल सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गणेश गाडे घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर आरडाओरड झाल्यानं शेजारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश गाडे यांनी घराच्या दरवाज्यातच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आई व दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूचं गूढ कायम
या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. प्राथमिक माहितीत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली तरी मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातूनच या घटनेमागचं खरं कारण समोर येणार आहे. आत्महत्या की अन्य काही प्रकार, याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेला नाही. आईसह दोन चिमुकल्यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अवघ्या सात आणि तीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं या घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेमागचं गूढ काय? याचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान राहुरी पोलीस प्रशासनासमोर आहे.

डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणाशी संबंध
डॉ. मनीषा जेजूरकर यांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या प्रमुख संशयित डॉ. स्वाती नकुल वंजारी उर्फ स्वाती शंकर चव्हाण हिला नाशिक जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रक्कमेच्या एक किंवा अधिक जामीनदारांच्या हमीवर जामिनावर नाशिकरोड कारागृहातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *