एमपीएससी आंदोलनाला राजकीय वळण?; शासनासोबत चर्चा व लेखी आश्‍वासनानंतरही आंदोलन पुन्हा सुरू करण्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा विद्यार्थ्यांविषयी सवाल

पुणे: मुख्यमंत्री आणि शासनासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्यांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली होती. या बैठकीनंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत आपले आंदोलन स्थगित करण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन दिले होते. मात्र, असे असतानाही पुण्यात परतल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन का सुरू करण्यात आले? असा खडा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच, या संपूर्ण प्रकारामागे आंदोलनाला जाणूनबुजून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या वतीने मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन सुरू असून, या आंदोलनावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर झालेल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर योग्य ती चर्चा पार पडली होती. तरीदेखील आंदोलनाची दिशा बदलून ते पुन्हा भडकवले जात असल्याने यामागील राजकीय हेतू काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या घडामोडींमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता मोठे राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून, राजकीय पक्षांच्या भूमिकेवरही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *