कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूर: कराराप्रमाणे कंपनीला साखर पुरवठा न करता ६१ लाख ७४ हजार ४८८ रुपयांची व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रेडर्स कंपनीच्या दोघांवर जुना राजवाडा पोलिसांत गुरुवारी गुन्हा दाखल झाला. दीपक सोपान बरगे (वय ६८), प्रशांत दीपक बरगे (वय ४०, दोघेही रा. सैनिक बंधू निवास, पाचवा बस स्टॉपसमोर फुलेवाडी, कोल्हापूर, सध्या रा. बाळासाहेब इंगवले नगर, प्लॉट क्रमांक १७ बी, फुलेवाडी रिंग रोड) अशी बापलेकांची नावे आहेत.


या प्रकरणी राजाराम प्रताप सिन्हा (वय ५३, रा. साधनगर, मेन रोड पालम कॉलनी, नवी दिल्ली) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी अभिजित भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा हा गुन्हा १४ मार्च, २०२५ ते ऑक्टोबरपर्यंत बरगे यांच्या राहत्या घरी आणि कागल पंचतारांकित येथील जे. एम. टी. सी. कृषी प्रा. लि. या कंपनीच्या गोडावूनमध्ये घडला. फिर्यादी सिन्हा दिल्ली येथील ओ. एस. आर. ट्रेडर्स कंपनीचे मालक आहेत. तर आरोपींची जे. एम. टी. सी. कृषी कंपनीचे मालक आहेत. बरगे वेगवेगळ्या ट्रेडर्सना साखर पुरवठा करण्याचे काम करतात. सिन्हा यांची कंपनीही देशातील वेगवेगळ्या ठिकाणी होलसेल साखर पुरवठ्याचा व्यवसाय करतात.

आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या कंपनीला दहा हजार मेट्रिक टन साखर देण्याचा करार केला. हा व्यवहार मार्केट दरापेक्षा किलो पाठीमागे तीन रुपये कमी दराने देण्याचे ठरविले. फिर्यादीचा व्यवस्थापक स्वप्नील पाटील याच्याकडून सर्व लेखी करार केले. त्याच्याकडून ठेव आणि साखरेसाठी १ कोटी १२ लाख ६३ हजार ७७५ रुपयांची रक्कम स्वीकारली. मात्र त्या रकमेच्या तुलनेत काही प्रमाणातच साखर आणि ठेव रक्कम परत दिली. नियोजित करारानुसार कंपनीला साखरेचा पुरवठा केला नाही. त्यामुळे ६१ लाख ७४ हजार ४८८ रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *