अमरावती: ना डॉक्टर, ना नर्स, ना रुग्णवाहिका.. उपचाराविना महिलेचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात मोठा उद्रेक आणि तीव्र रोष!

अमरावती: चिखलदरा तालुक्यातील चिलाटी-सिमोरी रस्त्यावर रविवारी सकाळी ११ वाजता झालेल्या अपघातातील गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथे एकही डॉक्टर, नर्स किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने अखेर खासगी वाहनाने चुरणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि प्रहार-शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आणि शवविच्छेदन करू न देण्याचा इशारा दिला आहे.

उपचारापूर्वी मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या

निष्काळजीपणाला कंटाळून नातेवाइकांनीच तातडीने खासगी वाहनाची व्यवस्था करून त्यांना चुरणी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उशीर झाल्यामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

कारवाईची मागणी
आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच बहिणीचा नाहक बळी गेल्याचा आरोप मृत महिलेचे भाऊ शिकारी बेठेकर यांनी केला. मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या हतरू आरोग्य केंद्रातील संबंधित डॉक्टर, कर्मचारी व रुग्णवाहिका चालकावर तात्काळ निलंबनाची आणि गुन्हेगारी निष्काळजीपणाची कारवाई व्हावी, अशी मागणी प्रहार-शिंदेसेना तालुकाध्यक्ष नरेंद्र टाले यांनी केली. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि शवविच्छेदन करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
काय आहे नेमकी घटना ?
रायपूर येथील रहिवासी भुरय मिथुन धांडे (२५) आपल्या माहेरी जात असताना चिलाटी-सिमोरी रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व नातेवाईकांनी त्यांना तातडीने जवळच असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, या आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर किंवा नर्स कर्तव्यावर उपस्थित नव्हते. इतकेच नाही तर गंभीर जखमी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी ऑबुलन्सची सुविधाही उपलब्ध नव्हती.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *