पुणे: जिल्ह्यातील बारामतीमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. महेश अंकुश उगले (वय ३६, ब. नं. २६३७) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदाराची पत्नी बारामतीत झुंबा डान्स क्लास आणि जिम चालवते. या डान्स क्लासमुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी क्लास तसेच तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात एक अर्ज दिला होता. हा अर्ज चौकशीसाठी पोलीस हवालदार महेश उगले याच्याकडे वर्ग करण्यात आला होता. या प्राप्त अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस हवालदार उगले याने चक्क ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी त्रस्त नागरिकाने ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली होती.
तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान पोलीस हवालदार उगले याने ७ लाख रुपयांची मागणी केल्याचे आणि त्यापैकी २ लाख रुपयांची रक्कम यापूर्वीच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मंगळवारी (८ सप्टेंबर २०२६) बारामती शहरातील माळेगाव रोडवरील पी.डी.सी.सी. बँकेच्या परिसरामध्ये एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून उर्वरित ५ लाखांची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पोलीस हवालदार महेश उगले याला रंगेहात पकडले.
या धडक कारवाईनंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्याने अशा प्रकारे लाच घेतल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहर
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
महाराष्ट्र
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- बीड: चोरीसाठी थेट १९०० किमीचा प्रवास! बीडच्या आष्टी पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई, हरियाणामधील कुख्यात जनावरे चोरांची टोळी जेरबंद!
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
गुन्हा
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
























Subscribe to my channel




