Jayant Patil : राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण…; जयंत पाटलांचं वक्तव्य

Jayant Patil : आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती. पण, एकत्रीत काम करायचं असल्याने आपण ती सोडली. पण, 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून शरद पवार यांना भेट द्यायची असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी बोलून दाखवले आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे जयंत पाटलांचे आवाहन 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट द्यायची आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे.  त्यामुळे आत्तापासून तुम्ही कामाला लागला असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तळेगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण काम करत आहेत. हे तरुण चांगले काम करत आहे. एकदा आम्ही महाराष्ट्रात 72 आमदारांच्या संख्येवर पोहोचलो होतो. राज्यात मुख्यमंत्री करण्याची संधी आमच्या पक्षाला आली होती. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी ती संधी आम्ही सोडल्याचे पाटील म्हणाले. 2024 ला आम्ही 114 लढवू किंवा 120 लढवू आघाडी ज्यावेळी होईल त्यावेळी निर्णय होईल. पण जेवढ्या जागा लढवू तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याची जिद्द आपण बाळगली पाहिजे. आजही पवारसाहेब 24 तास काम करत आहे. त्यामुले 2024 ला सगळ्यात मोठी गिफ्ट द्यायची असल्याचे पाटील म्हणाले.
विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे काम सुरु असल्याचे जयंत पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या विरोधात जो माणूस बोलतो त्याला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. पाच लाख लोकांमधून निवडून येणारे नेते नवाब मलिक आहेत, ते सगळे सहकार्य करायला तयार आहेत. त्यांना आत घालण्याचे काम केले जात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply