Yavatmal Crime News : भोसा परिसरात वाळू घाटावर गोळीबार, 25 जणांवर गुन्हा दाखल; चाैघांना अटक

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील भोसा परिसरातील वाळू घाटावर एका गटाने दुस-या गटावर गोळीबार केल्याची घटना मध्यरात्री घडली. वाळू तस्करांकडून गाेळीबार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत काेणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर यवतमाळ पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

या घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी : पैनगंगा नदीपात्रा रस्त्याच्या कारणांवरून एका गटाने दुसऱ्या गटावर गाेळीबार केला. या गाेळीबारच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संपुर्ण परिसर रात्रभर तणावग्रस्त हाेता.

Vilas Lande : अजित पवारांनी शिरूर लोकसभेत डावललं, नाराज विलास लांडे आढळरावांचा प्रचार करणार का?

दरम्यान या घटनेबाबत कृष्णा ढाले यांनी पाेलिसांत तक्रार दिली. ढाले यांच्या तक्रारीनूसार महागांव पोलिसांनी 25 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेतील चार संशयितांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाेलिसांनी घटनास्थळावरून चार रिकामे काडतूस आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *