Wayanad Landslides Update : वायनाडमध्ये जिथे भीषण विध्वंस, तिथे पोहोचले राहुल गांधी; २७७ जणांचा मत्यू, २०० जण अजूनही बेपत्ता

Wayanad Landslides Update : केरळच्या वायनाडमधील मेप्पाडीजवळ झालेल्या भूस्खलनातील २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०० नागरिक अजूनही बेपत्ता असून तेवढ्याच रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मदत शिबिरे आणि वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत.

वायनाडमध्ये युद्धपातळीवर विविध एजन्सी आणि सशस्त्रदलांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराने मुंडक्काई येथे ब्रिज बांधला आहे. वायनाडमध्ये 45 मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये 8,000 हून अधिक विस्थापित लोकांना आश्रय देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Uttarakhand Heavy Rain : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचं रौद्ररुप; जनजीवन पूर्णत: विस्कळीत, ११ जणांचा मृत्यू तर ४४ बेपत्ता

मृतांपैकी 200 जणांची ओळख पटली आहे. उर्वरितांची ओळख पटवली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. लष्कराकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे. मुंडक्काई आणि चुरलमला हे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झालं आहेत. दरम्यान दोन्ही भागांना जोडण्यासाठी 190 फूट लांबीचा बेली ब्रिज उभारण्यात आल आहे. मुंडक्काई गावात सुमारे 450 ते 500 घरं होती, त्यातील एकही घर शिल्लक नाही, सर्व घरं गाडली गेली आहेत.

वायनाड भस्खलनावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी उच्चस्तरिय बैठक बोलावली होती. बैठकीला विरोधी पक्षाचे नेतेही उपस्थित होते. मदत करणाऱ्या लष्कराच्या जवानांची जितकं कौतुक कराव तिथकं थोडं आहे. मलब्यात अडकलेल्या जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यात आलं आहे. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं कठीण होतं, त्यामुळे मशिन आणण्यासाठी पूल बणवण्यात आल्याची माहिती पिनाराई विजयन यांनी दिली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply