Wardha Water Shortage : वर्धा शहरात पाणी टंचाई; तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, मुख्य जलवाहिनी फुटली

 

Wardha : वर्धा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून ठप्प झाला आहे. तर जलवाहिनी दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने आणखी तीन दिवस शहरात पाण्याची समस्या राहणार आहे. या अनुषंगाने राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बैठक घेत ट्रॅकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वर्धा शहराला धाम नदी प्रकल्पतून पाणीपुरवठा केला जातं असून प्रकल्पातून येणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. मागील तीन दिवसांपासून पालिका प्रशासन जलवाहिनीत दोष शोधत होते. आज पालिकेला जुनापानी चौकात जलवाहिनी फुटलेली आढळली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीला युद्धपातळीवर काम करण्यात येत असून आणखी तीन दिवस शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी सांगितले.

वर्धा नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना येळाकेळी व पवनार येथील पंपीग स्टेशन वरून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु येळाकेळी येथून येणारी मुख्य पाईपलाईन जुना पाणी चौकात लिकेज झाल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर झालेला आहे. मागील तीन दिवसांपासून शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे.

Bus Accident : कोळेगाव घाटरस्त्यात बस २० फूट खोल दरीत कोसळली; पंधरा प्रवासी जखमी

पाणी समस्येबाबत राज्यमंत्र्यांकडे तक्रार

शहरातील आर्वी नाका परिसर, प्रताप नगर, म्हाडा कॉलनी, गजानन नगर, बॅचलर रोड, साबळे प्लॉट, राधा नगर, मानस मंदिर परिसर, गोरस भंडार कॉलनी, गांधी नगर, साने गुरुजी नगर, सुदामपुरी, गोंड प्लॉट, यशवंत कॉलनी, खडसे ले आउट, इंदिरा नगर, केळकर वाडी परिराला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड अडचण होत असल्याच्या तक्रारी राज्यमंत्री पंकज भोयर प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिय विश्रामगृह येथे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा प्रशासन, नप व जिप अधिका-यांची बैठक बोलावली होती.

टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शहरातील पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेऊन जुना पाणी चौकातील लिकेज दुरूस्तीच्या कामाची माहिती जाणून घेतली. तीन दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने खास करून महिला वर्गाची मोठी अडचण होत असल्याचे सांगितले. अनेकांच्या घरी, बोअरवेल व विहिर नसल्याने त्यांना नगरपालिकेचा पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागते. मात्र तीन दिवासापासून पाणी पुरवठा होत नसल्याने त्यांच्या वणवण भटकण्याची वेळ आली आहे. तथापि या भागाला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, असे आदेश दिले.

तसेच लिकेजचे काम तातडीने पुर्ण करून शहराला पाणी पुरवठा सुरळीत करावा. यासाठी युद्धस्तरावर कार्य करण्याचे निर्देश दिले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी भगत यांनी तातडीने पीडित भागाला पाणी पुरवठा करण्यात येईल; अशी माहिती देऊन लिकेजचे देखील काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply