Sportsman: डावखुरा स्फोटक बादशाह ते ब्रेन क्लॉटशी लढणारा योद्धा– कांबळी चमक आणि अंधाराची खरी कहाणी

मुंबईचा 'कांबळी' – हे नाव ऐकताक्षणी डोळ्यांसमोर येतो तो सचिन तेंडुलकरचा बालमित्र, शारदा आश्रम विद्यामंदिरचा तो डावखुरा फटकेबाज, ज्याने केवळ २१ वर्षांच्या लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये दोन डबल सेंच्युरी ठोकून भारताला वेड लावलं होता!

शालेय क्रिकेटमधला विश्वविक्रम
१९८८ मध्ये हरिस शील्ड स्पर्धेत सचिन तेंडुलकरसोबत ६६४ धावांची अविश्वसनीय भागीदारी! हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्या वेळी दोघेही केवळ १५-१६ वर्षांचे होते. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात त्या जोडीला 'सचिन-कांबळी' म्हणूनच ओळखले जायचे. कांबळीने रणजी ट्रॉफीमध्येही पहिल्या चेंडूवर सिक्स मारून दमदार एंट्री केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला स्फोटक उदय
१९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडेवर कसोटी डेब्यू त्याने केला. तिसऱ्या कसोटीतच २२४ धावा! लगेच पुढच्या कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध २२७! मग श्रीलंकेविरुद्ध १२५ आणि १२०. म्हणजे पहिल्या ६ कसोटी सामन्यांत ४ शतके, त्यात २ डबल शतके!

विशेष रेकॉर्ड्स:
भारतीय क्रिकेटरांमध्ये सर्वाधिक कसोटी सरासरी (५४.२०) – पण फक्त १७ कसोटी खेळून!
१४ इनिंग्जमध्ये १००० धावा – भारतीय क्रिकेटरांमध्ये सर्वात वेगवान.
तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध (इंग्लंड, झिम्बाब्वे, श्रीलंका) सलग तीन कसोटी शतके – जगात एकमेव खेळाडू!
वनडे क्रिकेटमध्येही १०४ सामन्यांत २४७७ धावा, २ शतके आणि १४ अर्धशतके. १९९५ च्या एशिया कप विजेते संघाचा भाग.
 ७ कसोटीनंतर कांबळीची सरासरी १००.४ होती – डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!

कुठे कमी पडली कांबळी ची प्रतिभा?
प्रचंड प्रतिभा होती, पण निवड मंडळही कुठेतरी त्याला डावलत होतं.त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर आणि खेळावर पडत होता.वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत शॉर्ट पीच बॉलिंग वर खेळताना त्याला अडचण येत होती, पण अशा अशा अडचणींचा सामना प्रत्येक खेळाडूला करावा लागत असतो.त्यामुळे कांबळी हा शॉर्ट पिच बॉलिंगसमोर कमकुवत होता असा म्हणता येणार नाही. ऑफ-फील्ड अनुशासनाचा अभाव, पार्ट्या, वाद आणि व्यक्तिगत समस्या यामुळे २३ वर्षांच्या वयातच कसोटी संघातून तो बाहेर पडला. वनडे २००० पर्यंत चालले, पण नियमित जागा मिळाली नाही.
मुंबईसाठी मात्र तो रणजी ट्रॉफीचा रणबाज होता – १२९ फर्स्ट क्लास सामन्यांत ९९६५ धावा, सरासरी ५९.९७, ३५ शतके!

जीवनातील उतार-चढाव
क्रिकेट सोडल्यानंतर आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, व्यसन आणि आरोग्याच्या तक्रारी. २०११ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती. १९९६ विश्वचषक सेमीफायनलबद्दल वादग्रस्त विधान करूनही चर्चेत राहिला.

सध्याची स्थिती (२०२६)

कांबळी (वय ५४) गंभीर आरोग्य समस्या भोगत आहेत – ब्रेन क्लॉट, युरिनरी इन्फेक्शन, बोलण्यात अडचण. भाऊ विरेंद्र यांनी प्रार्थना आणि मदतीची अपील केली आहे. सचिन तेंडुलकरसह अनेक मित्र (सुनील गावस्कर इ.) संपर्कात आहेत आणि मदत करत आहेत. कांबळी अजूनही घरी रिकव्हरीत आहे, पण पूर्ण बरा होण्यासाठी वेळ लागेल.

काय शिकवतो कांबळीचा जीवनप्रवास?
प्रतिभा पुरेशी नाही, यश हाताळण्याची तयारीही हवी. लहान वयात मिळालेले यश, प्रसिद्धी आणि पैसा यांचा समतोल साधता आला नाही तर... कांबळी हा त्याचा जिवंत उदाहरण आहे. तरीही त्याची नेत्रदीपक ड्राईव्ह आणि बॅटिंग स्टाइल आजही क्रिकेट रसिकांना आठवते.

तो खेळाला ते दिवस सोनेरी होते... पण आयुष्य हे ११ खेळाडूंच्या टीमसारखे नाही, एकट्यानेही लढावे लागते!
विनोद कांबळी – एक चमकता तारा, जो फार लवकर मावळला. पण त्याने सोडलेली आठवण आणि धडे मात्र कायम राहतील.
प्रतिभावान खेळाडूंसाठी तो इशारा आहे – शिस्त आणि मानसिक ताकद हीच खरी खेळी! 
                                                                                                  - विश्वजीत माने



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Sportsman: डावखुरा स्फोटक बादशाह ते ब्रेन क्लॉटशी लढणारा योद्धा– कांबळी चमक आणि अंधाराची खरी कहाणी

Leave a Reply to Willow4196 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *