आजकाल प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये सत्य कथा, हॉरर कॉमेडी अशा प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतात. पण, सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या एका चित्रपटाचा टीझर पाहून तुमची झोपच उडेल. या टीझरमध्ये एक तांत्रिक चक्क मृचदेह फाडून खाताना दिसत आहे. जर तुम्ही हळव्या मनाचे असाल तर हा टीझर पाहू नका. कारण या टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये ही थरकाप उडवणारी आहेत.
‘द केरळा स्टोरी‘ आणि ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ सारख्या चर्चित चित्रपटांचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा ‘चरक – आस्था का मेला’ (Charak: Fair of Faith) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा अवघ्या 52 सेकंदाचा टीझर अंधश्रद्धा, तांत्रिक विधी आणि अंधभक्तीच्या काळ्या बाजूचे भयानक चित्रण आहे. विशेषतः एका दृश्यात तांत्रिक व्यक्ती मृतदेह फाडून खाताना दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहतोय.
[embedded content]
अंधश्रद्धा आणि तांत्रिक प्रथांच्या काळ्या बाजूवर भाष्य
चित्रपटाची कथा मुख्यतः भारतातील ग्रामीण भागात रुजलेल्या अंधश्रद्धा आणि तांत्रिक परंपरांभोवती फिरते. रहस्यमय ‘चरक मेळा’ (Charak Mela) च्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली ही गोष्ट एका समुदायाची आहे, जिथे हा उत्सव अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची शेवटची संधी मानला जातो. मेळ्यातील विधी, आस्था आणि उन्माद वाढत जातो तसतसे विश्वास, बळी आणि भक्तीशी निगडित अनेक अस्वस्थ प्रश्न प्रेक्षकांसमोर येतात.
टीझरमधील सर्वाधिक चर्चेत असलेला संवाद आहे: “चरक में लाशों की भेंट क्यों चढ़ाते हैं?” याचे उत्तर आणखी धक्कादायक आहे. या दृश्यात तांत्रिकाचे भयावह रूप दाखवण्यात आले आहे, ज्याने टीझर पाहणाऱ्यांना हादरवून टाकले आहे. चित्रपट अंधश्रद्धा आणि विकृत अध्यात्मावर कठोर टिप्पणी करणार असल्याचे स्पष्ट दिसते. हा चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कोणते कलाकार दिसणार?
‘चरक: आस्था का मेला’ या चित्रपटात अंजली पाटील, सुब्रत दत्ता, नलनीश नील, शशिभूषण, शंखदीप आणि शौनक श्यामल यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




