Vashi-Mankhurd : सायन - पनवेल मार्गावरील वाहतुक कोंडीतून सुटका, वाशी ते मानखुर्द प्रवास होणार सुपरफास्ट

 

Vashi-Mankhurd : वाशी ते मानखुर्द प्रवास आता सुसाट होणार आहे. कारण वाशीखाडी पुलावर उभारण्यात आलेल्या २ नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, या दुसऱ्या पुलाचे उद्घाटन आज ५ जून रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

या नव्या उड्डाणपुलामुळे सायन - पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे. उद्घाटनानंतर काही दिवसांत हा पूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणांकडून देण्यात आली आहे.

वाशी खाडी पूल परिसरात वाढती वाहतूक ही मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाशी खाडीत दोन नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता

या प्रकल्पातील पहिला पूल, मानखुर्दहून वाशीकडे जाणारा मार्ग ऑक्टोबर महिन्यातच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता दुसऱ्या दिशेचा, वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा पूल तयार झाला असून, त्याचे आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

Ambernath : माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला, रस्त्यावर रक्ताचे पाट; अंबरनाथमध्ये रक्तरंजित थरार

नागरिकांना दिलासा

दुसऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडीतून सामान्यांना दिलासा मिळणार आहे. दररोज वाशी ते मानखुर्द दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांचे वेळेची बचत तसेच इंधनाची बचत होणार आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने ही सुविधा सकारात्मक ठरणार आहे. पुलाचे उद्घाटन होताच नागरिकांसाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

नागपूर ते मुंबई आता पूर्णपणे विनाअडथळा

नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवास आता पूर्णपणे विनाअडथळा आणि सुसाट होणार आहे. आज, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.

या टप्प्यातील इगतपुरी ते आमनेदरम्यानचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्ग आता प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *