Varsha Gaikwad : मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीचा तिढा सुटला; वर्षा गायकवाड यांना उमेदवारी

Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये असलेला तिढा आज सुटलाय. उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. मुंबईमधील जागा वाटपाबाबत पक्षाने विचारात घेतले नसल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. आज काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय.

वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली जात नसल्यावरून शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दलित असल्यामुळे मुंबईतून त्यांना उमेदवारी देऊ नये, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे, असा गौप्यस्फोट मिलिंद देवरा यांनी केला होता. काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नेमणूक करताना विरोध झाला होता. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या २१ उमेदवारांमधून फक्त एका दलित उमेदवाराला निवडणुकीत संधी दिली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. दरम्यान उत्तर मध्य मुंबईती महाविकास आघाडीचा उमेदवारी जाहीर झालीय. पण महायुतीकडून अद्याप कोणताच उमेदवार देण्यात आलेला नाहीये, यामुळे वर्षा गायकवाड यांची लढत कोणासोबत असेल हे पाहावं लागेल.

Lok Sabha Election : मुंबईतील १० जागांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात; अद्यापही मविआ आणि महायुतीत काही जागांवर तिढा कायम

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. पण या मतदारसंघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र आज अखेर वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासही इच्छुक होत्या. मात्र दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply