Vande Bharat Express : साईभक्तांच्या आवाक्याबाहेर वंदे भारत; असे आहेत तिकीट दर...

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवा शनिवारपासून सुरू होणार आहे.

मात्र, या ट्रेनचे तिकीट सर्वसामान्य साईभक्तांना परवडणारे नाहीत. सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत सुपरफास्ट ट्रेनच्या चेअर कारसाठी १ हजार ३०५ रुपये तर एक्सकेटीव्ह क्लाससाठी २ हजार ३०५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर दादर -शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या स्लीपर सीटला केवळ २५५ रुपये सीट आहे.

वंदे भारतचे वेळापत्रक-

मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस;

ट्रेन क्रमांक 22223 मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सीएसएमटी रविवारीपासून दररोज (मंगळवार वगळता) सकाळी 6.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.40 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल ट्रेन क्रमांक 22224 साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस साईनगर शिर्डी शनिवारपासून दररोज (मंगळवार वगळता) संध्याकाळी 5.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या दोन्ही गाड्यां दादर, ठाणे आणि नाशिकरोडला थांबा असणार आहेत.

मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस-

ट्रेन क्रमांक 22225 मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवारपासून दररोज (बुधवार वगळता) दुपारी 4.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस शनिवारपासून दररोज (गुरुवार वगळता) सोलापूर येथून सकाळी 6.05 वाजता सुटेल आ

असे आहे तिकीट दर-

- सीएसएमटी ते साईनगर शिर्डी - चेअर कार

रु.८४०, एक्सकेटीव्ह क्लास- रु.१६७०

सीएसएमटी ते सोलापूर चेअर कार

रु.१०१०, एक्सकेटीव्ह क्लास- रु.२०१५

केटरिंग शुल्कासह तिकीट दर-

- सीएसएमटी ते साईनगर शिर्डी - चेअर कार

रु.९७५, एक्सकेटीव्ह क्लास- रु.१८४०

-सीएसएमटी ते सोलापूर चेअर कार

रु.१३०५, एक्सकेटीव्ह क्लास- रु.२३०५

प्रवाशांचा खोळंबा-

पंजाब मेल, सेवाग्रामच्या प्रवाशांचा खोळंबा वंदे भारत ट्रेनमुळे आज पंजाब मेल आणि सेवाग्राम एक्स्प्रेस गाडीच्या प्रवाशांचा खोळंबा झाला. दररोज या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत जातात. मात्र आज वंदे भारतमुळे या दोन्ही गाड्या दादर पर्यंत चालवण्यात आल्या.

त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसेच सीएसएमटीहुन दुपारी ३.१५ वाजता नागपूरसाठी सुटणारी सेवाग्राम गाडी साडे चार वाजेपर्यंत सुटली नव्हती. तसेच त्याबाबत कोणत्याच सूचना दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे प्रवाशी संताप व्यक्त करत होते.

णि त्याच दिवशी दुपारी 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी थांबा असणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply