Pandharpur Maghi Yatra : पंढरपूरातील माघी वारीत विठ्ठल मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले

Pandharpur Maghi Yatra : माघ शुद्ध एकादशी निमित्त लाखाे भाविक पंढरपूरात माघी यात्रेसाठी आले. या निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या  दर्शनासाठी पाच लाखांपेक्षा अधिक भाविक (devotee) पंढरपूरात आले हाेते. यंदा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न चौपट वाढले आहे. 

माघ यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीला एकूण उत्पन्न चार कोटी 88 लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये एक कोटी 59 लाख रूपयांचे सोने, चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. तर देणगीच्या (donation) स्वरूपात 3 कोटी 29 लाख मिळाले आहेत.
यंदाच्या माघी वारीसाठी राज्यभरातून जवळपास पाच लाख भाविक पंढरीतआले होते. गतवर्षी पेक्षा भाविकांची संख्या अधिक असल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *