Unseasonal Rain : बिबवेवाडीत पावसाने दाणादाण, झाडे पडली, पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी

बिबवेवाडी : शनिवारी दुपारी झालेल्या गारांच्या जोरदार पावसामुळे गावठाण परीसरात दाणादाण उडाली, रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पावसाचे येऊन तुंबल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यातच कोंढवा रस्त्यावर कुमार पार्क समोर झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली.

महेश सोसायटी चौकात भूमिगत नाला तुंबून रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी आले त्यामुळे चौकाला चारही बाजूंनी पाण्याने घेरले होते, नाल्यावरील लोखंडी जाळी व तीन चेंबरची झाकणे पावसाच्या पाण्याच्या दाबाने उघडली होती त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर पाणी आले, महेश सोसायटी चौक ते भारत ज्योती बस थांब्या पर्यंत रस्त्याच्या एका बाजूला नदीचे स्वरुप आले होते,

अनेक वाहने अर्ध्या पर्यंत पाण्यात बुडाली होती, उघडलेल्या चेंबर मध्ये वाहने अडकून पडत होती, पाण्याच्या दाबाने चौकात अनेक वाहने पडली. भारत ज्योती बस थांब्यापासून अनेक वाहनचालकानी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने वाहने नेण्याचे प्रयत्न केल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती.

अप्पर बस डेपो समोर सीमेंटच्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साठून राहिले होते त्यामुळे व्ही आय टी हॉस्टेल चौकातून येणारी वाहतूक खोळंबली त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन चौकात वाहतूक कोंडी झाली.

बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर कुमार पार्क सोसायटी समोर वीस वर्षे जुने झाड उन्मळून रस्त्यावर पडले सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही एका दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले, झाडा लगत रस्त्याला फुगे विकणार्‍याची पाल ठोकलेली आहे, जोराच्या पावसामुळे त्यांनी शेजारच्या इमारतीचा आसरा घेतला होता.

झाडा शेजारी एका गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे त्यासाठी खोदकाम झालेले आहे त्यामुळे झाडाच्या मुळांचा आधार ठिसूळ झाल्यामुळे झाड पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती, अग्निशामक दलाच्या जवानांनी एक तासात झाड तोडून जेसीबी च्या सहाय्याने बाजूला केले.

झाड पडल्यामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरून कोंढवाकडे जाणारी वाहतूक वसंत बाग चौकात थांबवली होती तर कोंढवा वरुन येणारी वाहतूक गंगा धाम चौकातून वळविण्यात आली होती त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पावसाळी कामांच्या निविदा प्रक्रिया नुकत्याच झाल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी कामे सुरू झाली आहे, पावसाळ्यात पाणी साठलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तेथील कामे त्वरित पूर्ण करणार असल्याचे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश पवार यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply