Ulhasnagar Crime: चप्पलमध्ये गांजा लपवला, कैद्याला द्यायला कोर्टात गेला, पोलिसांना समजताच धूम ठोकली

 

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कैद्याला कोर्टामध्ये पूरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा गांजा देण्याचा प्रयत्न फसला. पोलिसांच्या लक्षात आल्याचे पाहून कारवाई होईल या भीतीने तरुणाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. चप्पलच्या बॉक्समध्ये हा गांजा आणण्यात आला होता. या घटनेची सध्या उल्हासगनरमध्ये चर्चा होत आहे.

 

जेलमधून न्यायालयात हजेरीसाठी आणलेल्या आरोपीला एक तरुण चप्पलेच्या बॉक्समध्ये गांजा द्यायला आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. ही बाब लक्षात येताच या तरुणाला पकडायला पोलिस गेल्यावर त्याने कोर्टाच्या जिन्याची जाळी तोडून उडी मारत पोबारा केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याचा तपास करत आहेत.

Pune Traffic Report : पुण्यातली वाहतूक कोंडी जगात भारी, टॉप ५ मध्ये कोणती शहरे?

उल्हासनगर कॅम्प ४ मधील एका मारहाणीच्या प्रकरणात मुकेश जाधव, महेश जाधव, लक्ष्मण जाधव, हर्षद सकट आणि जतिन चौहान यांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना सोमवारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी एक अज्ञात तरुण हा आरोपी हर्षद सकटकडे आला आणि त्याने त्याला एक चप्पलेचा बॉक्स दिला.

पोलिसांनी आरोपी हर्षद सकटला दिलेला चप्पलचा बॉक्स तपासायला घेतला असता त्यात गांजा सापडला. त्यामुळे घाबरलेल्या त्या तरुणाने चक्क पहिल्या मजल्याच्या जिन्याची जाळी तोडत खाली उडी मारली आणि पळून गेला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा चप्पलेचा बॉक्स पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply