Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीनेही आगामी निवडणुकीसाठी एकत्र पाऊल टाकलं आहे. लोकसभा निकालानंतर पहिल्यांदा एकत्र घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. यावेळी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार,यावरही उद्धव ठाकरेंनी मोठं भाष्य केलं.

लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले. ठाकरेंनी यावेळी महायुतीवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी विरोधकांच्या विविध आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
 
ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिदाचा कोण असेल, यावर उत्तर देताना महायुतीला लक्ष्य केलं. मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा कोण? यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, महायुतीचा चेहरा कोण आहे? तिन्हीच्या तिन्ही गाव ओसाड आहेत.कांद्यामुळे भाजप रडला. त्यांनी जे सोबत घेतले, तेही त्यांच्यामुळे रडले'.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करतान ठाकरेंनी म्हटलं की,'नाना पटोले यांचा विषय संपला आहे. आम्ही जागा मागे घेतली आहे. या निवडणुकीत मोठा भाऊ छोटा भाऊ चालणार नाही. सगळ्यात चांगला उमेदवार हा कोणत्या ठिकाणी कोणाचा आहे, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *