Uday Samant : आम्ही देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मानतो; असं का म्हणाले शिंदे गटाचे मंत्री?

Uday Samant :  जिल्ह्यात मी भाजप  पदाधिकाऱ्‍यांच्या संपर्कात आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतो. ते भाजपसाठी महाराष्ट्रात जो निर्णय घेतील, तो आम्हाला बंधनकारक आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्‍यांना जो निधी पाहिजे, तो देण्याचा प्रयत्न आहे. समित्यांवरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेतले आहे. पालकमंत्री म्हणून भाजपाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘रत्नागिरीत भाजपच्या सर्व पदाधिकारी व नेत्यांच्या मी संपर्कात आहे. त्यांच्याशी विकासकामांबाबतही चर्चा करत आहे. अगदी ठाण्यापासून अनेक पदाधिकारी संपर्कात आहेत. रत्नागिरीचे संपर्कमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशीही चर्चा करत आहोत.’

Akola Crime News : संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, सिगारेटचे चटके देत केसही कापले; काळीमा फासणारी घटना

बाळ मानेंबाबत बोलताना ते म्हणाले, ‘माजी आमदार व भाजपचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बाळ माने यांचाही मतदार संघात मोठा आवाका आहे. एक चांगली संस्था ते चालवतात. काय समज-गैरसमज असतात ते दूर होत असतात. १९९९ पासून आपण या मतदार संघात कार्यरत आहोत. पहिल्या चार वर्षात २००४ पर्यंत घेतलेली मेहनत आपण सर्वांनीच पाहिली आहे. त्यानंतर मी सातत्याने जिंकत आहे.

आपला संपर्क नेहमीच तळागाळातील जनतेशी असतो. त्यामुळे कोण काय बोलतो याकडे मी लक्ष देत नाही. मतदारांच्या मनात जे आहे तेच होणार आहे. ज्यांना कुणाला जे काय करायचे ते करावे. आपण जनतेशी बांधिल असल्याचेही पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

कुणी पाठच्या दाराने भेटते

सर्वच पक्षांचे पदाधिकारी आपल्याला भेटतात. कुणी समोरून भेटायला येते, कुणी पाठच्या दाराने भेटते, कुणी मंत्रालयात भेटायला येतात; पण आपण कुणाची नावे उघड करू इच्छित नाही. कुणाची कामे झाल्यावर आपल्याला शिव्या द्यायच्या असतील तर त्यांनी खुशाल द्याव्यात, असाही टोला त्यांनी हाणला; परंतु आपण काम केल्याचे बोलून दाखवायचे नाही. त्याला नीती हेच उत्तर आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply